करमाळा प्रतिनिधी भारताचा वारसा, संस्कृती सामर्थ्य समृद्ध करण्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले ज्ञसुन सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार महिला सक्षमीकरण आदर्श राज्य कारभाराचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळसर यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गुलमोहरवाडी ता.करमाळा येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रा शिवाजीराव बंडगर पंचायत समितीचे माजी सभापती पै अतुल पाटील, उदयसिंह पाटील,बहुजन संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ कदम सरपंच संतोष बाबर, विनोद बाबर, कानतोडे सर,वाघमोडे सर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना झोळसर यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांनी ज्याप्रमाणे काम केले त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करणे गरजेचे आहे आज आपण करमाळा तालुक्याची परिस्थिती पाहता उजनी धरण 61 टक्के भरले असताना सुद्धा पाण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वणवण करावी लागत आहे . प्रशासनामार्फत तालुक्यात ४५ टँकर चालू असून त्यांची यंत्रणा तोकडी पडत असल्याने प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशन च्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये गाव गावात पाणी देण्याची व्यवस्था केली जात आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर मराठा मुस्लिम समाजाला आरक्षण शिक्षणासाठी मिळणे आवश्यक असून निदान शिक्षणासाठी सवलत मिळणे गरजेचे आहे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. दत्तकला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही चार हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून यामध्ये इंजीनियरिंग फार्मसी याबरोबर व्यवसायिक शिक्षणाकडे मुलांचा कल वाढत आहे. 75 टक्के मुली दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये व्यावसायिक शिक्षण घेत असून पंचवीस टक्के मुले फक्त शिक्षण घेत असल्याने भविष्यामध्ये हे चित्र बदलण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे असून मुलांनी मुलांनीही मुलींचा आदर्श घेऊन शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या गावचे सरपंच बागडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कार्यक्रम घेतला हे कौतुकास्पद आहे. शिक्षण हे एकच असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करता येते की आपल्या जीवनामध्ये बदल करता येऊ शकतो रामभाऊ येडे यांनी सांगितले की ढाल तलवारीने लढाई होती त्यावर लढाया जिंकल्या जात होत्या. यावेळी झोळसर यांनी सांगितले आज ज्ञान आणि बुद्धीची लढाई आहे कारण मी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आज तुम्हाला समाजामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षण हे एकच असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपल्याला स्वतःमध्ये सुधारणा करता येते .शिक्षणामध्ये शासनाने सर्व समाज घटक पुढे यावेत म्हणून आरक्षण दिलेले आहे . आज त्या आरक्षणामुळे आमच्या बरीचशी मंडळी शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत. की समाजाला पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाला जाहीर करावे लागतात दुसरे एक मला या ठिकाणी सांगायचे की कुठलाही समाज असू द्या आपण फक्त एखादी मोबाईल वरती पोस्ट टाकतो किंवा वाचतो त्यापेक्षा मी सगळ्यांना म्हणेल की ज्या शासनाच्या योजना पाहिजे असेल मराठा समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्याचा आरक्षणाचा विषय अजूनही शासनाला सोडवता आलं नाही. धनगर समाजबाबतीतली एक गोष्ट मी सांगतो 2019 चा एक किस्सा आहे त्याच्यामध्ये बारामती मध्ये आरक्षण आंदोलन चालू होतं .धनगर समाजाला आंदोलन म्हणजे आरक्षण मिळावं म्हणून 2019 चा विषय आहे त्याला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल त्यापेक्षा सध्या आपल्याला त्यांच्या सवलती घेता येऊ शकतात का असा विषय महादेव जानकर आमच्या दोघांमध्ये झाला.लोकसभेचे इलेक्शन फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये जाहीर झालं होतं त्याच्या अगोदरचा तो विषय फेब्रुवारी मधला होता त्यांनी फडणवीस साहेबांशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आरक्षण देता नाही आलं तर सवलती मिळाल्या पाहिजे .तुम्हाला सांगतो त्यावेळेस फक्त घोषणा झाली 2019 चे इलेक्शन झालं नंतर कुठली सवलत मिळवायचे असेल तर मग शैक्षणिक असू द्या किंवा कुठल्या व्यवसायाच्या संदर्भातले असेल फक्त घोषणा करून उपयोग नाही तर त्याचा शासन निर्णय निघाला पाहिजे त्याप्रमाणे आदिवासी समाजाला आहेत त्या दहा सवलती धनगर समाजाला त्या 2019 च्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.आजची युवा पिढी मोबाईल मध्ये व्यस्त असते पण त्यांनी शासनाच्या योजनेच्या किती जणांनी अभ्यास केला प्रवेश घेत असताना आपल्याला शहरांमध्ये शिक्षणासाठी खर्च कसे मिळतात.आज कुठल्याही व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असताना आपल्याला फी असते त्याच्यामध्ये जवळजवळ 90% फी माफी आपल्याला शासनाने केली असेल फार्मसी इंजिनीरिंग मेडिकल असेल तर त्यासाठी सुद्धाज्ञ आदिवासी समाजाला आहेत त्या धनगर समाजाला त्या 2019 च्या जीआरच्या माध्यमातून देण्यात आल्या या सर्व अभ्यासक्रमाला आपल्याला फक्त एखादा विद्यार्थी जर शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये गेल्यावर विद्यार्थिनी शहरांमध्ये खर्च कसा मिळातो यांची तरतूद करून दिलेली आहे.ए बी सी डी वर्गीकरण केले आहे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे.मेंढीपालन चाऱ्यासाठी सुद्धा पैसे दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला जागा हवी असेल तर त्या जागेसाठी सुद्धा पैसे देत आहे .2019 धनगर समाजातील मुलांना त्याच्यात एक आधुनिक योजनेचा फायदा दिला होता जी ज्या पालकाचे उत्पन्न एक लाखाच्या आतला आहे त्यांना लांबून इंग्लिश शाळेमध्ये 70 हजार रुपये शासन खर्च करत आहे . माहिती घेऊन आपण किती फायदा घेतो तर जुन्या काळात मध्ये जी गरज होती त्या पद्धतीने नवीन काळामध्ये काय गरज आहे ते व्यावसायिक शिक्षण घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे प्रा रामदास झोळसर यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…