Categories: करमाळा

युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल भैय्या चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ जुन रोजी महा रक्तदान शिबीर अभिष्टचिंतन सोहळा*


करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील युवा उद्योजक सोलापूर जिल्हा युवा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्या आठ जून रोजी असणारे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा जार प्रमाणपत्र सह सप्रेम भेट देण्यात येणार आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये साई कमल लॉज बायपास रोड करमाळा येथे होणार आहे .रक्तदान हेच हेच खरे जीवनदान असून मानवी रक्त कृत्रिमरित्या कुठेही तयार करता येत नाही. त्यामुळे आपण केलेले रक्तदान आपले रक्त हे एखाद्याचा जीव वाचू शकते ‌ याच्यासारखे कोणतेही पुण्यकार्य कुठलेही नाही त्यामुळे या भव्य रक्तदान महाशिबिरामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन उस्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन निखिल भैया चांदगुडे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरानंतर निखिल भैया चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत मान्यवर नेते मंडळाच्या उपस्थितीत मित्रमंडळाचेवतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.तरी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

20 hours ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago