करमाळा प्रतिनिधी :- करमाळयातील युवा नेते तथा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी करमाळा येथील युवा सेनेच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले. निखील चांदगुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासैनिकांनी युवा सेना संपर्क कार्यालयाचे व महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेनेचे करमाळा माढा विधानसभा संपर्क प्रमुख रवि आमले, बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे, कुर्डूवाडीचे माजी नगरसेवक अरविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. सावंत म्हणाले की, युवा सेनेचे मध्यवर्ती कार्यालय करमाळा येथे सुरू झाल्याने गोरगरीबांसाठी ही आनंदाची बाब असून आमचे युवा सैनिक 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय झाल्यास आपण युवा सैनिकांशी या कार्यालयात येवून संपर्क साधू शकता तसेच शासनाच्या विविध योजना या कार्यालया मार्फत मार्गी लागणार असून चांदगुडे यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू देणार नाही. तसेच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होवून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून सदरची बाब कौतुकास्पद असल्याचे गौरोद्वगार यावेळी प्रा. सावंत यांनी चांदगुडे यांच्या विषयी बोलताना केले.
यावेळी निखील चांदगुडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे कार्य समाजाभिमुख असून त्यांच्या विचारांना प्रेरित होवूनच आम्ही सर्वसामान्यांसाठी युवा सेना मध्यवर्ती कार्यालय करमाळा येथे चालू केले आहे. तसेच रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने अनावश्यक खर्च टाळून या शिबीराचे आयोजन केलेले आहे. प्रा. सावंत यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आम्हाला सामाजिक व राजकीय कार्य करण्यास स्फूर्ती प्रदान करीत असून लवकरच करमाळा तालुक्यात युवासेनेचा झंझावात निर्माण करून आगामी विधानसभेत शिवसेना युवा सेनेची ताकद आम्ही दाखवून देवू व करमाळयातील विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचेही यावेळी चांदगुडे यांनी सांगितले.
चांदगुडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्य्छा देण्यासाठी विविध राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी तसेच शिवसेना युवा सेनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रचंड गर्दी केली होती
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…