Categories: करमाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान;गणेश चिवटेंच्या नेतृत्वात करमाळ्यात जल्लोष


करमाळा प्रतिनिधी :- नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल करमाळ्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसोबतच भाजपा व एनडीएमधील घटकपक्षातील ६३ सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी,मुरलीधर मोहोळ,पीयूष गोयल,रक्षा खडसे,प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देशाच्या इतिहासात सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान काल मिळवला व देशात सलग तिसऱ्यांदा देशात भाजपा नेतृत्वाचे मोदी 3.O सरकार सत्तेत आले. यानिमित्त करमाळा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीराम चौकात एकत्र जमून फटाके फोडले, बँजोच्या गजरात ठेका धरत एकमेकांना साखर आणि पेढे वाटून मोठ्या उत्साहात जल्लोष केला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अगरवाल, जेष्ठ नेते राधेश्याम देवी, महेश परदेशी, संजय आण्णा घोरपडे ,नाना मोरे,सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे,अमोल पवार,जयंत काळे पाटील,गणेश माने, कपिल मंडलिक, आण्णा पडवळे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, पत्रकार दिनेश मडके, आजिनाथ कोळेकर वस्ताद,किरण बागल ,दिपक गायकवाड, विश्वजीत परदेशी, चरणसिंग परदेशी, वैभव आहेर, संजय जमदाडे, सचिन चव्हाण,मच्छिंद्र हाके, नवनाथ खाडे,नितीन निकम, हर्षद गाडे, राम परदेशी, राजश्री खाडे, संगीता नष्टे,पूजा माने, जयश्री वाघमारे,शरद कोकीळ,विनोद इंदलकर, महादेव गोसावी, संतोष जवकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

8 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

8 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago