आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वसामान्य जनतेला सहजपणे भेट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये ना.एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने क्रमांक १ वर असेल याबाबत कोणाच्याही मनात शंका नसावी. सत्ता हे लोककल्याणाचे प्रभावी साधन आणि माध्यम असते या न्यायाने मुख्यमंत्र्यांनी या सत्तेचा थेट लाभ समाजातील शेवटच्या घटकाला करवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे वारंवार अनेक प्रसंगातून स्पष्ट होत आहे. सीएम म्हणजे चिफ मिनीस्टर नसून कॉमन मॅन आहे, हे मोठ्या मनाने सांगत आपल्या सहकाऱ्यांच्या मनात मी तुमच्यातीलच एक आहे, ही भावना निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण देश आज मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना पाहतो आहे.
अशी प्रचंड कार्यक्षमता अंगी बाळगून असलेल्या मुख्यमंत्र्यांचा एवढा मोठा व्याप सांभाळायला माणसंही तेवढीच कार्यकुशल, बुद्धीमान, हजरजबाबी अन् विनयशील असणं अत्यंत आवश्यक होतं. यामुळेच सत्तापरिवर्तनानंतर पहिल्यांदाच जी निवडक सात शिलेदार नेमल्या गेली त्यापैकी एक म्हणजे करमाळा भूमीपूत्र मंगेश नरसिंह चिवटे !
हाडाचे अन् वंशाने पत्रकार असणाऱ्या चिवटेंना मुंबई-पुणे-नागपूर ही शहरं नवीन नव्हती, अगदी दिल्लीसुद्धा ! त्यांच्या आतील पत्रकारामुळे अन् स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यामुळे चिकीत्सक वृत्ती हा चिवटेंचा स्थायी भाव. भारताच्या कानाकोपऱ्यातील भौगोलिक स्थानांपासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत आणि त्या त्या भागातील राजकीय इतिहासापासून ते सामाजिक स्वास्थ्यापर्यंत इत्यंभूत माहिती संकलनाचा नामी छंद असणारे चिवटे आज सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना आपलेसे वाटतात, ही त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्यपूर्ण खास बाब !
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा कार्यभार समर्थपणे सांभाळणारे मंगेश चिवटे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील मागील जवळजवळ आठ वर्षांपासूनच्या पूर्णवेळ अनुभवामुळे चिवटेंना अनेक आजाराविषयी, त्यावरील उपचार पद्धती, त्यासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणे, अनेक चाचण्या याचे सखोल ज्ञान आत्मसात झाले आहे. स्वतःच्या आतील विद्यार्थी कायम जागृत ठेवा असा संदेशच जणू ते आपल्या कृतीतून आम्हा सर्वांना देत आहेत.
साहित्याची आवड असणाऱ्या मंगेश चिवटेंमधील वाचक आणि श्रोता खूप दर्दी आहे. त्यांच्यातील कवी, एक मित्र म्हणून मला जवळून अनुभवता देखील आला. यामुळेच की काय, चिवटेंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, सकारात्मकता आणि स्वभावातील स्थितप्रज्ञता, संयमीपणा तसूभरही ढळताना कधी जाणवत नाही.
श्री श्री रविशंकर महाराजांचे शिष्यत्व स्विकारलेले चिवटे आपल्या सहकाऱ्यांना काम सांगताना सुद्धा विनंतीवजा बोलतात हा त्यांच्यातील महत्वपूर्ण गुण सर्वांनीच अंगी बाळगण्यासारखा आहे. एखाद्यावेळी एखाद्याचे काही चुकलेच तर प्रेमाने रागवणे, हा प्रकार नेमका काय असतो हे सुद्धा त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर लक्षात येते.
गोरगरीब, निराधार, दु:खी व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्या कार्यक्षमतेचे टॉनिक आहे हे सांगणाऱ्या मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांचे शिष्य असल्यामुळे त्यांचीच प्रेरणा मला या सामाजिक कार्यात कायम आशिर्वादरुपी प्रोत्साहन देते असे मंगेश चिवटे नेहमीच कृतज्ञतापूर्वक सांगतात.
सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांशीही सौहार्दपूर्ण स्नेह ठेवण्याच्या चिवटेंच्या स्वभावाचा सत्तापरिवर्तनात देखील मोठा फायदा झाला असणार यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे सरकारवर देखील अनेकदा प्रहार होता होता राहिले आहेत हेही तितकेचं खरे ! त्यामुळेच विद्यमान शासन, प्रशासन आणि मतदार यांच्यातील महत्वपूर्ण दुवा म्हणून चिवटेंकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा तळागाळापर्यंत झालेला लाभ सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी मोलाची भूमिका निभावत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट इतरांपेक्षा अधिक असण्याच्या काही कारणांमध्ये हे एक कारण निश्चितच विचार करण्याजोगे आहे.
मंगेश चिवटे या बहुआयामी व्यक्तीमत्वाबद्दल बोलण्यासारखे, लिहीण्यासारखे खूप काही आहे. गुरुवर्य, मित्र, मोठे बंधू म्हणून त्यांचा अभिमान आणि आदर आम्हाला नेहमीच वाटतो. रुग्णसेवेतून प्रचंड पुण्य कमावणाऱ्या माझ्या मंगेश सरांना दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपणास निरोगी आयुष्य लाभो, हीच पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना..!
लेखक
रुग्णसेवक डॉ.शार्दुल संतोषराव भणगे (धामणगांवकर)
उपसंपादक, दै.दिव्य लोकप्रभा
9325840007
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…