Categories: करमाळा

आंदोलनाच्या धसक्याने पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी दोन महिने देण्यासाठी टाळाटाळ केलेली कागदपत्रे दोन तासात दिल्यामुळे उपोषण मागे-औदुंबरराजे भोसले

करमाळा प्रतिनिधी आंदोलनाच्या धसक्याने पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी दोन महिने देण्यासाठी टाळाटाळ केलेली कागदपत्रे दोन तासात दिल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची माहिती श्री औदुंबरराजे यांनी दिली.
नेरले तालुका करमाळा येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम न करता जुन्या पाणी पुरवठा विहिरीला बोर्ड लावून सात लाख रुपये चा अपहार केला आहे. त्याविषयीची काही कागदपत्रे मागणी केली होती, ती कागदपत्रे सुमारे दोन महिन्यापासून पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी कर्मचारीदेत नव्हते ,त्यामुळे आज नेरले ग्रामस्थांच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालया समोर उपोषण करण्यात आले, उपोषणास पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे ,ग्रामपंचायत माजी सरपंच अभिमान जगताप, दादासाहेब दौंड, सोसायटी चेअरमन तानाजी जगताप, युवक नेते अजित सावंत, महेशराजे भोसले पाटील ,समाधान शेळके, छगन महाडिक ,उत्तरेश्वर पन्हाळकर, बारीकराव कारंडे, बिभीषण सुरवसे, युवराज महाडिक, अनिल जगताप, विजय पन्हाळकर ,बाळासाहेब नाईक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते पाणीपुरवठा कार्यालयाचे उप अभियंता श्री शेख श्री वाहेकर श्री अभंगराव यांनी आंदोलकाचा व पत्रकारांच्या आक्रमकतेचा बातमीचा धसका घेऊन दोन महिने देण्यास टाळाटाळ करत असलेली कागदपत्रे दोन तासांमध्ये दिली . त्यामुळे तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे व पोलीस बांधवांचे नेरले ग्रामस्थांच्या वतीने आभार आणि आजचे उपोषण भाग घेत असल्याचे माहिती नेरले ग्रामपंचायतचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago