Categories: Uncategorized

माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्याचे स्वागत शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी आज सन 2024/25 या वर्षातील जि.प शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा नेरले येथील सन 2024/25 या वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे स्त्री शिक्षणाच्या आद्यकर्त्या सावित्रीबाई फुले यांचे पूजन नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले पंचायत समिती माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे ग्रामस्थांच्या व पालक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.नेरले शाळेला श्री फारुक सय्यद यांची नवीन नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.वह्या पुस्तक वाटप नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच अभिमान जगताप ज्येष्ठ उत्तम पाटील शहाजी पाटील पालक समिती सदस्य गणेश गलांडे युवराज महाडिक राजेंद्र जाधव दादासाहेब बाळासाहेब नाईक श्री अनिल जगताप श्री दत्तात्रेय सुरवसे श्री आजिनाथ लोंढे दीपक लोंढे श्री बापू नाईक मुख्याध्यापक श्री जाधव शिक्षक श्री दीपक मोहोळ श्री कसबे श्री जाधव श्री मनेरी सौ आडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी श्री औदुंबर राजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांना शाळेसाठी कोणतीही अडचण आल्यास आम्ही दूर करू अशी आश्वासन दिले व विद्यार्थी तालुक्यात पहिला आल्यास त्या विद्यार्थ्याला व शिक्षकाला पाच हजार रुपये बक्षीस देण्याचे तसेच प्रत्येक वर्गातील पहिला दुसरा तिसरा येणारा विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे आश्वासन दिले.त्यावेळी सुनील लोखंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून चांगले काम करण्याच्या पाठीशी असते व चुकीचे काम करणाऱ्याला शिक्षा करते,त्यामुळे तुम्ही चांगले काम करा आम्ही तुमचे पाठीशी आहोत असा विचार व्यक्त केला.कार्यक्रमास वरील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षक श्री मनेरी यांनी सूत्रसंचालन केले व शिक्षक श्री दीपक ओहोळ यांनी सर्वांचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago