Categories: करमाळा

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना मिळणार शिष्यवृत्ती -प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 1554 अभ्यासक्रमांना फ्रीसिप व स्कॉलरशिप मिळत आहे परंतु ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फक्त 605 अभ्यासक्रमांनाच शिष्यवृत्ती मिळत होती. म्हणजेच तब्बल 950 अभ्यासक्रमांना या सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती. असे प्रा.रामदास झोळ सर यांनी सांगितले. त्यासाठी प्रा. रामदास झोळ सर हे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक सवलतीतील असमानतेबाबत मागील सात आठ वर्षापासून काम करत होते. शासनाकडे वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करून या शैक्षणिक सवलती लागू करण्यासंदर्भात सतत मागणी करत होते. त्यामध्ये त्यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यां प्रमाणे ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती , विशेष मागासवर्ग व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक 14 जून 2024 रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याप्रमाणेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीही 1554 अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे या समाजातील सर्व मुलांना 950 वाढीव अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने सदरची वाढीव अभ्यासक्रमांची शिष्यवृत्तीची सवलत ई.डब्ल्यू .एस , एस. इ .बी .सी व खुल्या वर्गातील मुलांना दिलेली नाही. या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विद्यार्थी तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे 1554 अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रा.रामदास झोळ सर यांनी सांगितले त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाने वाढीव 950 अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीची सवलत इतर मागासवर्गीय, विद्यार्थी भटक्या जमाती, विमुक्त जाती व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना शासन निर्णय काढून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…

5 hours ago

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

10 hours ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

13 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

1 day ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

1 day ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago