Categories: करमाळा

येत्या विधानसभेत भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे-दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी:- येत्या विधानसभेत भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन श्री.मकाई सह. साखर कारखाना माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले. ते मोरवड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते,पुढे बोलताना श्री. बागल म्हणाले की, मोरवड हे गाव माजी राज्यमंत्री लोकनेते स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या विचारांचे आहे. या गावाला बागल गटाने नेहमीच तालुका स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. तसेच या गावातील व परिसरातील प्रमुखांनी विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पुढाकार घ्यावा त्यावर आपण भाजप वरिष्ठ नेते यांच्या कडे पाठपुरावा करून या परिसराला निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही या वेळी बागल यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उध्दव नाळे हे होते. या वेळी बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, श्री. मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ नेते व संचालक बाळासाहेब पांढरे, संचालक नवनाथ बागल, सतीश नीळ, युवराज रोकडे, अजित झांझुर्णे,सचिन पिसाळ, बापूराव चोरमले, गोवर्धन करगळ, रामभाऊ हके, आशिष गायकवाड, रेवणनाथ निकत, संतोष पाटील, गणेश झोळ व नूतन स्वीकृत संचालक पदी निवड झालेले कल्याण सरडे सर,अशोक पाटील, विलास काटे, अनिल शिंदे, राजेंद्र मोहोळकर, गणेश तळेकर , बाजार समितीचे संचालक काशिनाथ काकडे, आदिनाथचे माजी संचालक नामदेव भोगे,गौडरेचे माजी उपसरपंच अशोक हनपुडे, फिसरेचे माजी सरपंच भारत रोकडे, बबन दौंड, निमगावचे वि.का सोसायटीचे चेअरमन अतुल नीळ, जगन्नाथ ननवरे, रावगावचे सरपंच संदीप शेळके, युवा नेते अमित बागल, सोगवचे माजी सरपंच स्वप्नील गोडगे, उंदरगावचे सरपंच युवराज मगर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नूतन स्वीकृत संचालक व विद्यमान संचालक मंडळ यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन स्वीकृत संचालक कल्याण सरडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्र मोहोळकर यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

6 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago