Categories: करमाळा

वैद्यकीय मदत कक्षातील महाराष्ट्रातील सर्व रुग्णसेवकांनी रुग्ण सेवा करताना जात पात पंथ पक्ष गट तट न पाहता माणुसकीच्या भूमिकेतून काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा प्रतिनिधी 
स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या भूमिकेतून समाजसेवा केली धर्मवीर आनंद दिघे यांनी आपले पूर्ण आयुष्य सर्वसामान्यांसाठी अर्पण केले .हाच समाजसेवेचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातील महाराष्ट्रातील सर्व रुग्णसेवकांनी रुग्ण सेवा करताना जात पात पंथ पक्ष गट तट न पाहता माणुसकीच्या भूमिकेतून काम करावे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगेश  यांचा सत्कार केला.
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी आले होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते .वाढदिवसाचे निमित्ताने 170 रुग्णसेवकांनी रक्तदान केले दोन अपंगत्व आलेल्या मुलांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा मदत निधीचा चेक देण्यात आला यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या रुग्णसेवकांनी आपली मते व्यक्त केली शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जवळपास आतापर्यंत 70 हजार रुग्णांना मदत झाली असो हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत .या सत्काराला उत्तर देताना मंगेश चिवटे म्हणाले की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व प्रकारची ताकद रुग्णसेवकांना दिल्यामुळे आज रुग्णसेवेचा वटवृक्ष झाला आहे .
महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचा कार्यकर्ता तयार झाला आहे .
राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वैद्यकीय  योजनेतून रुग्णांना मदत मिळून देण्याचे काम केले जाते राजकारण व समाजसेवा ही दोन वेगळी क्षेत्र असून समाजसेवा करताना जो मानसिक आनंद मिळतो जो त्या मदत मिळालेला रुग्णाचा आशीर्वाद मिळतो तो खऱ्या अर्थाने आयुष्याला सार्थक करणारा आनंद आहे अशी शेवटी मंगेश चिवटे यांनी सांगितले.अपंगत्व असलेल्या दोन मुलांना पन्नास हजाराचा निधी आतापर्यंत ७० हजार रूग्णांना मदत चिमुकल्यांना केक भरवून वाढदिवस साजरा या वाढदिवसनिम्मिताने अनेकांनी केले वृक्षारोपण केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

24 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago