करमाळा(प्रतिनिधी) आज दि.21 जून जागतिक योग दिनानिमित्त करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांना योग करण्याचे फायदे व योग दिनाचे महत्व समजावून देण्यात आले. सकाळच्या सत्रात सर्व इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून योगा करण्यास लावले होते. यावेळी जिल्हास्तरिय योगा स्पर्धेचे बक्षीस मिळवून राज्यस्तरीय योगा स्पर्धेत निवड झालेली ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट ची विद्यार्थीनी राजलक्ष्मी सुतार व इतर सहकारी तसेच इन्स्टिट्यूट चे विवेक कांबळे सर यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी त्रिमुर्ती स्पोर्ट क्लब चे संचालक श्री सागर शिरसकर सर यांचे मोलाचे योगदान लाभले.या योगशिबिरास प्रा.डॉ महेश निकत सर संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट यांनी मार्गदर्शन केले व योगा , व्यायाम चे महत्व पटवून दिले .यावेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षकांनी योग शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…