करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग हीच सुखी जीवनाची आरोग्य संपन्न आयुष्याची गुरुकिल्ली असून प्रत्येकाने योग करून निरोगी जीवन जगावे असे आवाहन योगशिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले .करमाळा योग समितीच्यावतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग वर्गाच्या ठिकाणी प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी प्रोटोकॉल प्रमाणे योगा प्राणायाम आणि ध्यान घेण्यात आले. पुढे बोलताना ते म्हणाली की सध्याच्या धकाधकीची युगामध्ये प्रत्येक जण पैसा प्रतिष्ठेच्या मागे लागला आहे. आयुष्यभर पैशाच्या मागे लागून आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानवाची शरीर हे आजाराची माहेरघर बनले त्यामुळे केलेल्या कमवलेला पैसा त्याचा उपभोग घेण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र मनुष्याला दवाखान्यात कमवलेला पैसा व आयुष्य खर्ची करावा लागतो. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन परमेश्वराने दिलेल्या या योगविद्येचा लाभ घेऊ दररोज योग करून निरोगी सुखी संपन्न आयुष्य जगावे.यावेळी नागरिकांच्या जनजागरणासाठी योगदिंडी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून आणि अभिवादन करून योग दिंडीची सुरुवात करण्यात आली. सुरताल संगीत विद्यालय करमाळा, आर्ट ऑफ लिविंग करमाळा आणि पतंजली योग समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ही योगदिंडी काढण्यात आली. भारत माता कीकरमा जय, करे योग रहे निरोग, झाडे लावा झाडे जगवा अशा विविध प्रकारच्या देश हिताच्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी समाजसेवक श्रेणिक खाटेर , डॉ सुनिता दोशी, डॉ कविता कांबळे, डॉ महेश अभंग, प्राचार्य नागेश माने, ललित आग्रवाल इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर योग दिंडीत सहभागी होते . यावेळी मोफत योग वर्ग चालवणारे योग शिक्षिका सौ रेशमा जाधव, सौ सुलभा पाटील, योग शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे , अभयकुमार शहाणे, हनुमान सिंग परदेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संपत वीर गुरुजी, देशमाने गुरुजी, अशोक बरडे गुरुजी , श्री तानाजी महामुनी, प्रवीण देवी, सुरेश चाळक, कैलास यादव, एडवोकेट सुनील जोशी, बाळासाहेब महाजन, शिवलिंग करळे, पत्रकार दिनेश मडके, प्रदीप नलवडे, डॉ अनारसे, डॉ जाधव मंजुषा देवी, ज्योती मुथा, शिवकन्या नरारे इत्यादींनी केले. सूत्रसंचालन संतोष पोतदार तर निशांत खारगे यांनी आभार मानले.