Categories: करमाळा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग हीच सुखी संपन्न जीवनाची गुरुकिल्ली- सौ.मायाताई झोळ मॅडम.

करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून गंभीर आजारांचा त्याला सामना करावा लागत असल्याने आरोग्य संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग हीच आरोग्य संपन्न आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मायाताई झोळ मॅडम यांनी व्यक्त केले. दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली ता. भिगवण दौंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर, उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी, सचिव मायाताई झोळ मॅडम प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर यांनी सहभागी होत योगाचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना मायाताई झोळ मॅडम म्हणाल्या की आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये इतरांच्या बरोबरीने स्पर्धेत टिकण्यासाठी मनुष्य दिवस रात्र एक करून आपले ध्येय गाठण्यासाठी ‌ नुसता मृगजळामागे धावत सुटला आहे . यामुळे त्याचे आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असून आयुष्यभराची कमाई आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दवाखान्यामध्ये घालण्याची पाळी त्याच्यावर आले असल्याने कुंटुंबाची सर्व दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळेच मनुष्याने आपले शरीर ही संपत्ती म्हणून त्याचे आरोग्य टिकवण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने आपणास संजीवनी प्रमाणे ऋषीमुनींनी योगी प्राचीन विद्या आपणास दिली आहे या विद्येचा उपयोग करून करो योग रहो निरोग या उक्तीचा जीवनात अवलंब करून दररोज योग करून आपले जीवन सुखी समृद्ध संपन्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाची प्रात्यक्षिक केले. या योग दिनाच्या शिबिरामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न आयुष्य जगण्याचा संदेश दिला. दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago