Categories: करमाळा

कुणबी नोंदी व दाखले मिळण्याची प्रक्रिया गतिमान करून शैक्षणिक प्रवेशासाठीच्या जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची रश्मी बागल यांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी
सध्या सर्वत्र विविध शैक्षणिक प्रवेशासाठी ची प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत कुणबी नोंदींची प्रक्रिया ही संथगतीने सुरु आहे दाखले मिळण्यास विलंब होत आहे ही संपूर्ण प्रक्रियाच गतिमान करण्यात यावी तसेच विविध शैक्षणिक प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असण्याचा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत असून जुन्या नियमाप्रमाणे जातपडताळणी प्रस्तावाच्या पोहोच पावतीवर प्रवेश देत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या संचालिका भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांनी केली,यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन देऊन ते सोडविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली चर्चा सकारात्मक झाले असून विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले याची माहिती बागल यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

20 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago