Categories: करमाळा

कार्यकर्ता मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद पाहता रश्मी बागल यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार… केतूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिग्विजय बागल यांनी व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी वाशिंबे.
करमाळा तालुक्यातील सामान्य जनता आजही रश्मी बागल यांच्या पाठीशी असून कार्यकर्ता मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रश्मी बागल यांना तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन मकाईचे मा.चेअरमन दिग्विजय बागल यांनी केतुर येथील मकाईच्या नवनियुक्त संचालक सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर नाझरकर होते करमाळा तालुक्यातील केतुर येथील रश्मी बागल व दिग्विजय बागल यांच्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांनी “कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित केले होते.मोरवड, केम,वांगी नं ३ येथील मेळाव्यांनंतर हा चौथा मेळावा होता.ज्या पद्धतीने या मेळाव्यांना सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा व सहभाग दिसून येतोय ते पाहून अधिक जोमाने लोकांमध्ये मिसळून काम करण्याची माझी देखील उर्जा वाढत आहे,आता दिदींना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा निर्धार मनात घट्ट होत चालला आहे.रश्मी दिदी सारखे सुसंस्कृत अन् उच्चशिक्षित नेतृत्व ओळखून पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी दिली आहे.तेव्हा करमाळा तालुक्यातून अशा नेतृत्वाला एक संधी दिलीच पाहिजे त्यासाठी जनमत तयार करण्याची जबाबदारी स्वतःहून सगळे उचलत आहेत ही महत्त्वाची बाब आहे.यावेळीदिगंबर नाझरकर,कांतीमामा पाटील,कैलास निसळ,बाळासाहेब पांढरे, दिनेश भांडवलकर,अमोल खाटमोडे,ॲड.संतोष निकम,रामभाऊ हाके,सतीश नीळ,काशिनाथ काकडे,आजिनाथ खाटमोडे, अजित झांझुर्ने,विलास काटे,दत्ता गायकवाड,ॲड जयदीप देवकर,रेवणनाथ निकत, दिनकर सरडे,गणेश झोळ,ॲड सोनवणे, शैलेश झोळ,अशोक बप्पा पाटील,दत्तात्रय कनीचे,रामदास कनीचे,दिवेगव्हाण चे सरपंच हनुमंत पाटील,सरपंच युवराज मगर,स्वप्नील गोडगे,रणजित शिंदे,महादेव नगरे,शहाजी पांढरे दत्ता कनीचे ,धनाजी देवकाते,सागर पवार,लाला जरांडे,अमोल जरांडे,कीर्तेश्वर कोकणे,नाना खाटमोडे,पप्पू गुळवे,महेश तळेकर,महावीर तळेकर,मारुती काटकर,सोमनाथ कनीचे इ प्रमुख पदाधिकारी तसेच केतुर नं २ पंचक्रोशीतील ग्रामस्थ या मेळाव्यास मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

.*केतूर येथील आयोजित मेळाव्यात बोलताना बागल यांनी उजनी जलाशयात गोयेगाव ते आगोती,तसेच पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान पूल बांधणे.डीकसळ पूल टाकळी खातगाव पोमलवाडी- केतूर पारेवाडी सावडी फाटा मार्ग हँम मधून विकसित करणे.

तसेच पोमलवाडी- येथे नव्याने 33/11केव्ही सबस्टेशन उभारणे.पारेवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा देणे. केतूर १ ते केतूर २ गावाला जोडणारा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करणे.किर्तेश्वर मंदीराच तिर्थक्षेत्र विकास कामासाठी निधी उपलब्ध करणे.
केतूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी मिळवणे.
करमाळा तालुक्यात सद्या करमाळा व जेऊर दोन उप विभागामार्फत महावितरणचे कामकाज सुरू आहे.पश्चिम भागाला उजनी जलाशयाचा काठ लाभला आहे.त्यामुळे या परिसरात वीजेची मागणी जास्त असून सबस्टेशनची ही संख्या जास्त आहे.त्यामुळे पश्चिम भागात पारेवाडी येथे नवीन उपविभाग सुरू करणे असे विविध प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

7 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

7 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago