करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रश्मी दीदी बागल यांना मताधिक्याने निवडुण देऊन काम करण्याची संधी द्यावी असे मत मकाईचे माजी चेअरमन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी या वडगाव उत्तर ता . करमाळा येथे कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बागल गटाचे जेष्ठ कार्यकर्ते वामनराव रोडगे होते. या कार्यक्रमांमध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालक स्विकृत संचालकाचा सत्कार युवा नेते मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर वडगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमास आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाईचे विद्यमान जेष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके सचिन पिसाळ, गणेश तळेकर, महेश तळेकर सर, काशिनाथ काकडे, एडवोकेट जयदीप देवकर, संतोष पाटील, आशिष गायकवाड, गणेश झोळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आनंदकुमार ढेरे अजित झांजुर्णे रामभाऊ हाके बाळासाहेब पांढरे रेवननाथ निकत संतोष पाटील बापू चोरमले गणेश झोळ नवनाथ बागल, कुलदीप पाटील,अमोल यादव ,अनिल अनारसे, युवराज रोकडे सौदागर दौंड,गोवर्धन करगळ सतीश निळ,कल्याण सरडे गणेश तळेकर महावीर तळेकर, अशोक पाटील ,अनिल शिंदे, विलास काटे ,राजेंद्र मोहोळकर स्वप्निल गोडगे,पृथ्वीराज जगताप, मल्हारी मारकड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विठ्ठल भांडवलकर रमेश जोशी, अजित जाधव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन सदरूद्दिन पठाण, प्रवीण जोशी हेमंत रोडगे गणेश अंधारे अनिल शिंदे पांडुरंग भांडवलकर रोहिदास रोडगे जालिंदर रोडगे नारायण भांडवलकर शैलेश शेगडे विठ्ठल जगदाळे योगेश जगदाळे सचिन अंधारे देविदास जोशी गोरख आबा थोरात विजय रोडगे जालिंदर रोडगे पिंटू दुर्गुळे गोकुळ थोरवे सुनील भांडवलकर हरी माने आरिफ पठाण रामदास शिंदे नवनाथ शिंदे रायगावचे सरपंच संदीप शेळके खडकीचे सरपंच बर्डे गुरुजी भोसेचे सरपंच प्रीतम सुरवसे उपसरपंच हनुमंत वारे पुनवर सरपंच ,पोथरेचे माजी सरपंच हरिश्चंद्र झि़जाडे ,मांगीचे सरपंच व विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप, कल्याण सरडे, प्रकाश काळे पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पुढे बोलताना दिग्विजय भैया बागल म्हणाले की मकाई आदिनाथ कारखान्यामुळे बागल गट अडचणीत आला होता .अशाही परिस्थितीत आपण हार न म्हणता सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन मामाने दिलेला सत्याचा व प्रामाणिपणाचा वसा जपला आहे. विरोधकांनीही आम्हास भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला. आमच्या जवळ राहून काही जणांनी गोड बोलून विश्वासघाताचे राजकारण केले. पण आता आम्हाला त्या माणसाची चांगली ओळख पटली आहे. त्यांचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.विरोध करायचा असेल तर समोरासमोर करा पाठीमागून गोड बोलून वार करू नका कारण विश्वासघातकी मित्रापेक्षा दिलदार शत्रू आम्हाला चांगला वाटतो. बागल गटांनी राजकारण सोडावे याकरिता विरोधकांनी कुरघुडीचे राजकारण केले मकाई कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँक प्रकरणापासून अडथळा आणण्याचे काम केले .परंतु एक दिवस सत्याचा नक्कीच येत असतो सत्याचा वाली परमेश्वर असतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदीं बागल यांना प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली आहे तसेच मकाई कारखान्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून मकाई सहकारी कारखान्याला आर्थिक सहकार्य मिळाले व बागल गट अडचणीतून बाहेर आला. आणखी वाहतूकदाराची काही देणे आहे तेही आम्ही देणारच आहोत. सध्या परिस्थितीत साखर कारखानदारी अडचणीत आहे.अशा परिस्थितीमध्ये अनेक नेत्यावर कारखाना विकण्याची पाळी आली त्यांनी त्यांचा प्रपंच वाचवण्यासाठी शेतकरी हितापेक्षा स्वतःच्या हिताकडे लक्ष दिले. पण शेतकरी सर्वसामान्य जनतेने अशा लोकांना कधी जाब विचारला नाही. कारण अशा लोकांकडून अपेक्षा करून काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे . बागलगटाने शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य भाव मिळावा त्याची बाकी कारखान्याकडू अडवणूक होऊ नये अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वर्गीय दिगंबरराव बागल यांनी मकाई कारखान्याची निर्मिती केली. शेतकरी हित जपण्याचे काम त्यांनी केले. आम्ही त्यांचा वारसा यशस्वीपणे चालवण्यासाठी जनकल्याण करण्यासाठी कारखाना चालवण्यासाठी घर जाळुन कोळशाचा व्यापार केला आहे.अदिनाथ कारखाना बागलानी बंद पाडला असा अपप्रचार केला होता .कारखाना सुरू केला कारखान्याचे देणी दिली नंतर राजकारणाचा भाग म्हणून शासनामार्फत प्रशासक नेमण्यात आले . पण त्याचा काही उपयोग झाला नाही उलट त्यांनी व्यवस्थित यंत्रणा न हाताळता कारखान्याची गाळप सुरू केले फक्त साडेपाच हजार टन ऊस गाळप त्यामुळे सोळा कोटी रुपये कर्ज झाले आहे.अजुन त्या कारखान्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन नाही शेतकऱ्यांना देणी अद्याप दिली गेली नाही.आदिनाथ कारखाना चालविण्यास कराराने देण्याचे ठरवले होते.यात विरोधकांनी विरोधासाठी विरोध म्हणून आमचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्याची काम केले. कारण त्यांना वाटले बागलांनी जर कारखाना सुरू केला तर आपल्याला राजकारणात कोणी विचारणार नाही व आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले. त्यामुळे तुम्ही आता सुजान नागरिकासून तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या आहेत. कारखाना बंद पाडण्यासाठी कुणी भुरळ घातली.हाणुन पाडण्यासाठी काम केले. त्यांना आता खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याची ही वेळ आली आहे . नुसते गोड बोलून तालुक्याचे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि मी सर्व काही केले असे आविर्भावात लोकांना फसवण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बाबतीत हीच घटना झाली.तीन हजार फुट पाइपलाइनसाठी अडचणी आणण्याचे काम केले.दहिगाव उपसा सिंचन योजना स्व.दिंगबरराव बागल मामा यांची योजना होती. त्यांच्या काळामध्ये ही योजना मंजूर झाली मामींच्या काळामध्ये ती योजना पूर्ण होऊ नये म्हणून केवळ साडेतीन हजार मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करायची राहिली होती. त्यासाठी विरोधकांनी ते काम केवळ याचे श्रेय बागलाला मिळू नये म्हणून ते काम हाणून पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणी वीज याबरोबरच ही तालुक्याच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी रश्मी दिदी दिंगबरराव बागल हे नाव आमदार म्हणून दिसले पाहिजे.रिटेवाडी उपसासिंचन योजना पुर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 400 कोटीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे .त्यामुळे रिटेवाडी योजना पूर्ण करण्यासाठी करमाळा तालुक्याचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी रश्मी दीदीं बागल आपली सेवा करण्यासाठी मतरूपी आशीर्वाद मागण्यास येणार आहेत.त्यासाठी कार्यकर्ते म्हणून आपणास काम करावे लागणार आहे. बागल गटांनी आतापर्यंत वडगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद कारखाना संचालक ते चेअरमन पदापर्यंत संधी दिली आहे. दिनेश भांडवलकर यांनीही मकाई कारखान्याचे चेअरमन म्हणून अडचणीच्या काळात चांगले काम करून दिलेल्या पद सोने करण्याचे काम केले आहे. बागल गटामध्ये कार्यकर्त्याला नेता करण्याची सामर्थ्य असून सर्वांना न्याय देण्याचे काम आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आपसातील मतभेद बाजूला ठेवून रश्मी दीदी बागल यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आता काळाची गरज आहे. करमाळा तालुक्यामध्ये स्वाभिमान जपण्यासाठी कार्यकर्ता जागा करण्याचे काम आम्ही करत आहोत.प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.माणसापर्यत जायचे तर उजळ माथ्याने स्वाभिमानाने त्यामुळे त्यांची देणी पहिल्यांदा दिली मगच बाहेर पडलो आहे.आता माघार नाही रश्मी दिदी बागल यांना आमदार झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसयाचे नाही.भाजप पक्षाच्या बागल कुटुंबातील आमदार झाल्याशिवाय कुकडीचे पाणी मांगी तलावात पाणी येणार नाही.एम आय डी सी मामांनी आणली पण ती चालु करण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधी काम केले नाही .रस्ते पाणी वीज या संदर्भात काही काम केले नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता सर्वांनी एकत्र येऊन रश्मी दीदीला आमदार करण्यासाठी कामाला लागावे अशी आवाहन दिग्विजय बागल यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक मकाई सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी केले . यावेळी बोलताना ते म्हणाले की बागल गट हाच असा एक गट आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्य पासून कारखान्याच्या चेअरमनपर्यंत काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांना नागरिकांना न्याय देणारा हा गट असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रश्मी दीदी बागल यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुमतांनी निवडून देण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जाधव यांनी केले प्रास्ताविक व आभार मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी मानले. या कार्यक्रमास आदिनाथ मकाई कारखान्याची संचालक करमाळा तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.