Categories: Uncategorized

शेतकऱ्याची थकीत ऊस बिल एफ आर पी प्रमाणे 15 टक्के व्याजासहित 10 जुलै पर्यंत न मिळाल्यास12 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करणार – प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी
शेतकऱ्यांची उस बिले तात्काळ मिळवुन द्यावीत जर आम्हाला 10 जुले पर्यंत आमची बिले एफ.आर.पी प्रमाणे 15 टक्के व्याजासहीत नाही मिळाली तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर 12 जुलै रोजी सकाळी 12 वाजता हलगीनाद आंदोलन करणार असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे एफ आर.पी बिल त्वरीत देण्यात यावे याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले असून जाधव रावसाहेब यांनी सदर निवेदन घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ आण्णा कांबळे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापु नेते तळेकर,मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष (शरद पवार गट) संतोष वारे ,पोपट फुके ,किसन हानपुडे बबन वीर ,अशोक गोडगे ,भगवान डोंबाळे ,धनाजी जाधव बापु फरतडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कमलाई साखर कारखाना पांडे ता. करमाळा, मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी ता. करमाळा, भैरवनाथ साखर कारखाना विहाळ ता. करमाळा या चारही साखर कारखान्यांना गाळप हंगाम 2021-22, 2022-23, 2023-24 मध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सदर कारखान्यांना ऊस गाळपासाठी दिला होता. परंतु त्याचे अद्यापही बिल आणि एफ.आर.पी आम्हाला मिळालेले नाही. खालील प्रमाणे कारखान्यांकडुन आमचे येणे बाकी आहे.
1. अदिनाथ स.सा. कारखाना 2023-24 ची थकीत उसबिले एफ. आर.पी प्रमाणे 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत.
2. कमलाई साखर कारखाना 2023-24 ची थकीत उसबिले एफ.आर.पी प्रमाणे 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत..
3. मकाई स.सा. कारखाना 2021-22 ची एफ.आर.पी प्रमाणे उसबिल 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत. 2022-23 ची एफ.आर.पी प्रमाणे उसबिल 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत. वाहनमालकांचे वाहतुक, कमीशन, डिपॉझीट येणे बाकी आहे. तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी देणे बाकी आहे.
4. भैरवनाथ साखर कारखाना 2023-24 ची थकीत उसबिले एफ.आर.पी प्रमाणे 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत.
नियमानुसार साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी या कारखान्यांनवर आर आर सी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर तसेच उप प्रादेशीक सह संचालक (साखर) सोलापुर यांना दिले होते त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झालेले आहे. परंतु आज पर्यंत आम्हाला आमची उस बीले एफ.आर.पी प्रमाणे मिळालेली नाहीत.शेतकऱ्यांची उस बिले तात्काळ मिळवुन दद्यावीत. जर आम्हाला 10जुलैपर्यंत आमची बिले एफ.आर.पी प्रमाणे व्याजासहीत नाही मिळाली तर आम्ही आपल्या करमाळा तहसील कार्यालयासमोर 12 जुलै रोजी सकाळी 12 वाजता हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रा. रामदास झोळ सर सर त्यांच्या सहकारी नेते शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

1 hour ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

2 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

1 day ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago