करमाळा तालुक्यातील ४० गावांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना आहे.रश्मी दिदी बागल यांनी पक्ष प्रवेश करते वेळी एकच प्रमुख मागणी केली होती ती म्हणजे रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधीक्षक अभियंता सिंचन भवन पुणे यांना आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणे विषयी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात सदरील योजनेच्या सर्व्हे साठी जवळपास ४५ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद होणार आहे.भाजप प्रदेशउपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून तालुक्यातील पांढरेवाडी व केम- वडशिवने उपसा सिंचन योजने साठी शासन दरबारी पाठपूरावा सुरू आहेत.रीटेवाडी उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन आमचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होणे विषयी आम्ही सातत्याने प्रयत्न राहीन असेही मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…