करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर कु.प्रगती विजयराव पवार हिने मिळवलेले यश कौतुकास्पद असून युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया प्रमुख गणेश कराड यांनी व्यक्त केले.जीवनात कितीही संघर्ष असला तरी चिकाटी प्रामाणिकपणाने परिश्रम केल्यास निश्चित यश मिळते कु . प्रगती विजयराव पवार हिची अमेरिका येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथे मास्टर ऑफ सायन्स इन इंजिनीअरिंग मॅनेजमेंट (एम .एस) शिक्षणासाठी झालेली निवड प्रेरणादायी आहे. तिच्या उच्च शिक्षणासाठी श्री स्वामी समर्थ इंजिनिअरिंगचे सर्वसर्वा भास्करराव माने देशमुख व जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश भास्करराव माने देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले आहे.गुरुदत्त माऊली भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने कु.प्रगती विजयराव पवार हिचा गणेश कराड यांच्या हस्ते आई वडीलासमवेत सहकुटुंब सत्कार करण्यात आला.यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सत्कार समारंभास भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिपक चव्हाण जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर पत्रकार दिनेश मडके, आर्ट ऑफ लिव्हिंग ,पतंजली योग समितीचे प्रमुख सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर ,उद्योजक अमरजित साळुंखे मनोज गांधी, हनुमंत भांडवलकर , डॉक्टर राजेश मेहता डॉक्टर विजय गादिया, मनोज पवार, उद्योजक शिवकुमार चिवटे मनोज कुलकर्णी, हनुमंत भांडवलकर,भाजप शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण दिंडोरी प्रणित गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या करमाळा केंद्राच्या प्रमुख सौ रेश्माताई कदम उपस्थित होते.एखादे स्वप्न मनाशी बाळगत असताना ते पूर्ण होण्यासाठी एकनिष्ठपणा, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम असणे खूप महत्त्वाचे आहे. शॉर्टकट मुळे कोणतीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही. सत्य मार्गाने आणि प्रामाणिकपणे केले प्रयत्न यामुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होता येते असे मत गणेश कराड यांनी व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना कु. प्रगती विजयराव पवार हिने सांगितले की विज्ञान कितीही पुढे गेले तरी अध्यात्म हेच खऱ्या अर्थाने आपणास खडतर परिस्थितीतून यश मिळवण्यासाठी प्रेरणा देते. श्री स्वामी समर्थ चरणी असलेली माझी भक्ती सेवा आई-वडिलांचे प्रोत्साहन आशीर्वाद याच्या पाठबळावर मला यश मिळवता आले आहे . माझ्या आई-वडिलांनी मुलगा मुलगी असा कधी भेद केला नाही.मला व माझी बहिण रेशम दोघींनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे .त्यांनी आम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यचे स्वातंत्र्य दिले त्यामुळेच आपण हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुले कुठल्याही बाबतीत कमी नाही फक्त आपल्या मनामध्ये असणारा न्यूनगंड दूर करून धाडसाने जिद्द चिकाटी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित असल्याचे कु.प्रगती विजयराव पवार यांनी सांगितले आहे. प्रगती हिची उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथे निवड झाल्याबद्दल व तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शैक्षणिक सामाजिक, अध्यात्मिक ,राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.