करमाळा प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करमाळा तालुक्यातील मौजे देवळाली येथे संपन्न झाला.या मेळाव्याचे आयोजन भाजपा सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी केले होते,या मेळाव्यामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख यांनी भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारने आतापर्यंत केलेल्या लोक उपयोगी योजना तसेच आता झालेल्या अर्थसंकल्प तील जनतेच्या हिताचे निर्णय सांगितले व महायुती सरकारच्या जास्तीत जास्त योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख यांनी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत व येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुक्यात कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या.कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल या दृष्टिकोनातून काम करावे असे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना सांगितले,यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, दिग्विजय बागल,जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, उमेश मगर,संजय घोरपडे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केली तर आभार शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले तर सुत्रसंचलन विनोद महानवर यांनी केले.या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, शशी कल्याणी,डॉ .अभिजीत मुरुमकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, देवळालीचे शहाजी पाटील, संदिपान कानगुडे, भैया गोसावी, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, लखन शिंदे, धनंजय चोपडे,
उपस्थित होते,
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…