Categories: करमाळा

करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार -प्रा रामदास झोळसर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याबरोबरच सामाजिक, वैद्यकीय आर्थिक,सांस्कृतिक क्षेत्रात करमाळा अग्रेसर राहण्यासाठी जनतेच्या ‌ कल्याणासाठी आपल्या आपण करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी व्यक्त केले आहे.वाशिंबे चौफुला येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक अंकुश दादा झोळ होते.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, अंकुश दादा झोळ, रामदास बप्पा झोळ, वाशिंबे गावच्या माजी सरपंच सौ झोळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, सुहास काळे,मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे, लालासाहेब जाधव वाशिंबेचे माजी सरपंच भगवानराव डोंबाळे, भानुदास टापरे,राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले,काॅंग्रेस आय ओ .बी .सी सेलचे तालुका अध्यक्ष गफुर शेख आबासाहेब मकर , धनंजय जगदाळे दिलीप जगदाळे विष्णू वाघमोडे, राजेंद्र वाघमोडे महादेव भोईटे, गणेश जाधव,गुलाब पवार सतीश शिंदे, सत्यवान कांबळे, सत्यवान गायकवाड ,दुर्याधन गायकवाड शंकर कांबळे दत्तात्रय कुलकर्णी, तात्या कळसाईत, सोमनाथ चव्हाण रोहित बाराहाते,महावीर ओस्तवाल,बाळू गुरव यांच्यासह प्राध्यापक रामदास झोळसर यांचे भाऊ भावजय पुतणे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.यावेळी करमाळा तालुक्यातील मकाई तसेच इतर साखर कारखान्याचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर त्यांच्या धर्मपत्नी सौ माया झोळमॅडम यांचा सत्कार शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. आपण जर विधानसभा निवडणूक लढा म्हणत असाल तर यावेळी विधानसभा निवडणुक लढविण्याची माझी तयारी आहे असल्याचे झोळ सर यांनी सांगितले .याप्रसंगी वाशिंबे व पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी त्यांना निवडणूक लढवावी असा एकमुखी मागणी करून आम्ही आपणास पाठबळ देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक रामदास झोळसर ते म्हणाले की राजकारण हे चांगल्या माणसांनी करण्याचे काम नाही असे म्हणून समाजातील चांगले सुसंस्कृत अभ्यासु माणसे राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे ‌ त्या भागाचा विकास खुंटतो व परत तीच माणसे मानतात की चांगल्या माणसाने राजकारणात आले पाहिजे परंतु बोलून दाखवण्यापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी चांगल्या माणसांनी पुढे आले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने विकास होऊन समाजाचे कल्याण होईल याच भावनेतून आपण करमाळा तालुका विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित असल्याने या तालुक्याचे परिस्थिती पाहता आपला तालुका मागास राहिल्यामुळे या तालुक्याचे भवितव्य धोक्यात आहे राजकारणी मंडळी केव्हा राजकारणापुरतं राजकारण करून आपला विकास करण्यात दंग आहे. गटातटाचे राजकारण करून फक्त जनतेला विकासाचे नुसते खोटे चित्र दाखवून भुल पाडण्याचे काम केले आहे.करमाळा तालुक्यामध्ये व्यवसायिक शिक्षणाची कुठलीही सोय नाही. ते कुठलेही मोठे इंजीनियरिंग मेकॅनिकल वैद्यकीय शिक्षणाचे कुठलेही कॉलेज नाही. त्यामुळे येणाऱ्या युवापुढे समोर दहावी बारावी पदवीधर झाल्यानंतर रोजी रोटीसाठी परगावी जाण्याशिवाय पर्याय नाही. करमाळा तालुक्यात आरोग्य दृष्ट्या मागासपासून एवढा मोठा तालुका असताना तालुक्यातील एकही मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल नाही आरोग्य सुविधाच्या अभाव मुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत बाहेरगावी जावे लागत असल्याने आर्थिक हानी बरोबरच जीवित हानी होण्याचे शक्यता वाढते आहे . उजनी धरणामुळे येथील शेतकरी काही प्रमाणात उसामुळे सधन झाला असला तरी शेतकरी च्या ऊसाला एक तर सध्या परिस्थितीत राजकारण सध्या परिस्थितीत राजकीय हस्तक्षेप मुळे भाव मिळत नाही भाव मिळाला तर बिल लवकर मिळत नाही. अशी परिस्थिती इथल्या शेतकऱ्याची झाली असून शेतकऱ्याचा वाली कोणी उरला नाही. त्यामुळेच करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करमाळा तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने तालुक्यातील समस्या बघून या समस्या सोडवण्यासाठी आज आपण राजकीय भूमिका घेतली नाही तर आपला तालुका आणखी मागे जाईल आणि भविष्यामध्ये आपण करमाळा तालुक्यासाठी काही नाही केले याचा पश्चाताप होईल अशी भावना माझ्या मनात निर्माण झाल्याने मी करमाळा तालुक्यासाठी राजकीय भूमिका घेऊन काम करण्याची ठरवले आहे . सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे दत्तकला प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की करमाळा तालुकयाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर अभ्यासू सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्वाची या तालुक्याला गरज असून भूमिपुत्र असणारे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संकुल उभा करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन समृद्ध करणारे प्राध्यापक रामदास झोळसर हे खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याचा विकास करून शकतात हे पटल्याने आपण यांना पाठिंबा दिला आहे. मी माझ्या जीवनात अनेक नेते पाहिले पण शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी वंचितांसाठी स्वतःच्या खिशातून पैसा घालून न्याय मिळवून देणारा सर्वसामान्य जनतेबद्दल तळमळ असणारा हाच खरा नेता तालुक्याचे नेतृत्व करू शकतो. त्यामुळे आता गटातटायच्या राजकारणाला व कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता जातीपातीच्या राजकारण न करता आपला हक्काचा माणूस म्हणून एक वेळ प्राध्यापक रामदास झोळसर यांना आमदार पदी निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी दिलेल्या संधीचे नक्कीच ते सोने करून सर्वसामान्य जनता शेतकरी,दिन दलित, वंचित युवक कामगार महिला या सर्वांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील असा विश्वास शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपीनाथ पाटील सर यांनी केले तर स्वागत कार्यक्रमाचे संयोजन श्रीकांत साखरे पाटील तर आभार प्राध्यापक रामदास झोळसर सरांचे थोरले बंधू वाशिंबेची माजी सरपंच श्री अनुरथ मधुकर झोळ यांनी मानले. या शेतकरी मेळाव्यास वाशिंबे गावासह करमाळा तालुक्यातील हजारो नागरिक युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी मेळाव्यास उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.प्राध्यापक रामदास झोळसर यांना विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी वाशिंबे मी गावकऱ्यांनी पाठिंबा दिला असुन येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मनातील आपला हक्काचा माणूस प्राध्यापक रामदास झोळसर यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा यांच्यावतीने साजरी

करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…

35 mins ago

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

4 hours ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

23 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

1 day ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago