करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे एफ आर.पी बिल त्वरीत देण्यात यावे याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलदार यांना देण्यात आले होते याबाबत जाधव रावसाहेब यांनी सदर निवेदन घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज प्रशासनाने तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. प्राध्यापक रामदास झोळसर सर यांच्या आंदोलनामुळे कमलाई कारखान्याने शेतकऱ्याची ऊस बिल खात्यावर जमा झाले असून पंधरा टक्के उर्वरित साडेतीन कोटी खात्यावर जमा करणार असल्याची सांगितले आहे. तर मकाई साखर कारखान्याने ऊस बिल जमा केल्याचे पत्र दिले आहे. मात्र १५ टक्के व्याजाची रक्कम जमा करण्याबाबत प्रशासनाला कुठलेही ठोस आश्वासन असे पत्र दिलेले नाही. यावरही प्रशासनाने मग मकाई सहकारी साखर कारखान्याला तशा सूचना करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची सुचित केले आहे. तर भैरवनाथ कारखान्यांनी ही ऊस बिल जमा केले असले तरी पंधरा टक्के व्याजाची रक्कम देण्याबाबत त्यांनाही सूचना करण्याची सूचित करण्यात आले आहे .तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल व 15 टक्के रक्कम शिल्लक असल्याने माॅलिसेस विकून बिल देण्याबाबतच्या सूचना प्रशासनामार्फत करण्यात येतील असे आश्वासन दिले असल्यामुळे हलगी आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले आहे. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर ,शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ आण्णा कांबळे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, बापू फडतरे,पोटेगावचे सरपंच प्रशांत नाईकनवरे, बापू वाडेकर, सुभाष काळे पाटील, देवळालीचे नाना ननवरे, खडकीचे निलेश शिंदे, तानाजी शिंदे, दीपक शिंदे, निमगावचे निल, हिंगणीचे प्रवीण तानाजी बाबर, बाबाजान खान तसेच अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, किसन हानपुडे बबन वीर ,अशोक गोडगे ,भगवान डोंबाळे ,धनाजी जाधव बापु फरतडे,बापु वाडेकर प्रा. राजेश गायकवाड गणेश बाबर रामचंद्र जाधव धनाजी जाधव आबासाहेब सरडे तात्यासाहेब सरडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या थकीत ऊस बिल आंदोलनाला मोठे यश मिळाले असून आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच पंधरा टक्के व्याजदराने साखर कारखान्यांनी ऊस बिल देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे प्राध्यापक रामदास झोळ सर व त्यांचे सर्व सहकारी नेते यांचे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी अभिनंदन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…