Categories: करमाळा

उजनी बँकवाँटर परिसरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी गोयेगाव, पोमलवाडी, ढोकरी येथे पूल उभारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आग्रही मागणी करणार.-दिग्विजय बागल


करमाळा प्रतिनिधी 
उजनी लाभक्षेत्रातील दळणवळण वळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी गोयेगाव, पोमलवाडी,ढोकरी येथे उजनी जलाशयात पूल उभारणी करणे गरजेचे असून यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन मकाई कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांनी वाशिंबे ता करमाळा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ जगदाळे होते करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे बागल गटाच्या वतीने “कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.मोरवड, केम,वांगी नं ३,वीट,वडगाव (उ) केतुर नं २ वरकटने,येथील मेळाव्यांनंतर हा नऊवा मेळावा होता.यावेळी बागल यांनी बोलताना सांगितले की
उजनी धरणात  अनेक गावांना जलसमाधी मिळाली.हजारो एकर शेतजमीन पाण्यात गेली.यासाठी सर्वात मोठा त्याग येथील धरणग्रस्त शेतकर्यांनी केला.परंतू उजनी बँकवाँटर परिसरातील गांवाना हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी ८० ते ९० किलोमीटरहून अधिक वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.परिनामी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो.परंतू हा प्रवास धोकादायक असून आत्तापर्यतं ४० हून अधिक जनांना यामध्ये जलसमाधी मिळाली आहे. याठिकाणी पुनर्वसनानंतर दळणवळणा साठी पर्यायी मार्गाची व्यवस्था झाली नाही.त्यामुळे गोयेगाव, पोमलवाडी,ढोकरी याठीकाणी पुल होणे गरजेचे असून ते आपल्या हक्काचे असल्याचे प्रतिपादन बागल यांनी केले.यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, ज्येष्ठ नेते व संचालक बाळासाहेब पांढरे,कल्याण शिंदे,प्रा.जाकीर शेख,विलास झोळ,जगदीष पवार,गणेश झोळ,शैलेश झोळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती चिंतामणी जगताप,मकाई चे संचालक,सतीश नीळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ काकडे,अजित झांझुर्ने,विलास काटे,रेवणनाथ निकत, विजय गोडगे,स्वप्नील गोडगे,बाळासाहेब सरडे,रणजित शिंदे,संतोष पाटील, साधना खरात,पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला या मेळाव्यास मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

सत्ता असो वा नसो बागल गटाने वाशिंबे गावासाठी विकास कामे केली.जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंबे येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी मिळाली असूनपाच कोटी हून अधिक निधी उपलब्ध होणार आहे.एक एमबीबीएस व एक बीए एमएस डॉक्टरकडून रुग्णावर मोफत उपचार केले जाणार आहेत.स्व.दिगंबरराव बागल मामा पंचायतसमिती सभापती असताना वाशिंबे येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर केला.तसेच शामलताई बागल यांच्या कार्यकाळात वाशिंबेत ३३/११ Kv सबस्टेशनला मंजूरी मिळून काम पूर्ण झाले.भैरवनाथ मंदीराला तिर्थक्षेत्र विकास आराखडा समावेश करुन क दर्जा देण्यात आला व मंदीर परिसरात सभागृह व पेव्हींग ब्लाँक बसविण्यात आले.गावातील मुख्य चौकातील समाज मंदीर ही बागल मामांनी केले.वाशिंबे येथील दोन्ही भूयारी मार्गाना आपल्या प्रयत्ना तून मंजुरी मिळाली आहे.येत्या काळात उजनी बँकवाँटर परिसरातील गावात दळणवळण मजबूत करण्यासाठीगोयेगाव, पोमलवाडी,ढोकरी पुल होणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपूरावा करणार. तसेच वाशिंबे जिल्हा परिषद शाळा ते नवीन भूयारी मार्गाला जोडणारा रस्ता व सोगाव म्हसोबा मंदीर ते जूने रेल्वे गेट नवीन भूयारी मार्ग रस्ता सिमेंट काँक्रीट करणे व दलित बांधवांसाठी बौद्ध विहार बांधण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधीची तरतुद करणार.

दिग्विजय बागल.
मा.चेअरमन मकाई सहकारी साखर कारखाना.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

17 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

18 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

3 days ago