Categories: करमाळा

झरे येथील अंगणवाडी इमारतीचे गौडबंगाल: इमारत भुईसपाट होऊनही २ महिन्यानंतर साधा गुन्हाही दाखल नाही: या इमारतीबाबत उलट सुलट चर्चा


करमाळा प्रतिनिधी
झरे तालुका करमाळा येथील अंगणवाडी क्रमांक १६ ही अज्ञात इसमानी एका रात्रीत भुईसपाट करून आज्ञाताने त्याचा ढिगाराही रातोरात गायब करून खळबळ माजवली आहे.याबाबत तब्बल दोन महिने उलटले तरीही साधा गुन्हाही दाखल झालेला नाही.अद्याप याचा तपास लागत असल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, २० एप्रिल २४ रोजी अज्ञात इसमाने एका रात्रीतच भरमध्यवस्तीत असणारी अंगणवाडी भुईसपाट करून अंगणवाडीतील मुलांच्या साहित्यासह सर्वच माती दगडाचा ढिगारा गायब करून अंगणवाडीचे अस्तित्व होते की नव्हते करून टाकले. याबाबत याची माहिती स्थानिक प्रशासनाला माहिती आहे अशी चर्चाही ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या ठिकाणी भरणारी अंगणवाडी, लहान मुलांचा किलबिलाट गेल्या दोन महिन्यापासून हवेतच वीरून गेला आहे.
याबाबत प्रशासनाकडून काहीच गांभीर्य व्यक्त होत नसून चक्क लाखो रुपये खर्चून २०१२-१३ सालातील ही अंगणवाडी उभारलेली चक्क गायबच केल्याने प्रशासनाच्या प्रामाणिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
झरे येथील अंगणवाडी क्रमांक १६ ही गावातील चिमुकल्यांनी भरत होती. दररोज या ठिकाणी मुलांचा किलबिलाट झरे ग्रामस्थांना सुखावत होता. मात्र २० एप्रिल २०२४ रोजी अज्ञात इसमाने ही अंगणवाडी भुईसपाटच करून टाकली. एवढेच नव्हे तर त्याचा ढिगारा ही रातोरात गायब केल्याने सकाळी त्या मुलांना शाळा दिसेनाशी झाली. ग्रामस्थ ही या प्रकाराने चक्रावून गेले. याची माहिती अंगणवाडी मदतनीस शैला औदुंबर मोरे यांनी फोन द्वारे पर्यवेक्षकांना कळवली. त्यानंतर २२ एप्रिल रोजी लेखी पत्राद्वारे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. याची माहिती सर्वत्र पसरताच एकच खळबळ उडाली होती. विनापरवानगी ही इमारत पाडल्याने झरे येथील बेकायदेशीर कारभाराचा कळस झाला होता. ही घटना कोणीही गंभीरपणे घेतली नाही. प्रशासनही याकडे धिम्मपणे पाहत आहे. स्थानिक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी याबाबत सर्वत्र तक्रारी केल्यानंतर इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही इमारत पाडण्यामागे प्रशासनाचा किंवा अज्ञाताचा हेतू काय होता हे उघड झाले नसून हे पोलीसांच्या तपासात ही बाब उघड होणार आहे.
याबाबत घटनास्थळाचा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तसेच ग्रामसेवक गावातील स्थानिक लोकांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला होता. त्या ठिकाणी इमारतीचे अवशेष साहित्य याचा लवलेशही नव्हता तर या ठिकाणी भरणारी अंगणवाडी हे इतरत्र भरण्यासाठी पर्यवेक्षकांना आदेश करण्यात आले होते. याबाबत प्रहार संघटनेचे सोमनाथ जाधव यांनी इमारत पाडू नये यासाठी प्रशासनाला सतर्क केले होते तसेच दुसरी अंगणवाडी उभारल्याशिवाय ही अंगणवाडी पाडू नये तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी याचा विचार करून निर्णय घ्यावा असे लेखी पत्र प्रशासनाला दिले होते तरीही आज्ञाताने विनापरवानगी ही इमारत नेस्तनाबूत केली.
दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून अंगणवाडी इमारत नसल्याने चिमुकल्या बाळांचा मात्र हिरमोड झाला असून हक्काच्या इमारतीत ही अंगणवाडी भरत नाही. याचे शल्य ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे .याचा कसून तपास होऊन या प्रकारामागे असणारे सत्य बाहेर काढून संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून आहे.

चौकट
झरे येथील अंगणवाडीची इमारत परवानगी न घेता अज्ञात इसमानी ती भुईसपाट करून त्याची विल्हेवाट लावली आहे. याबाबत करमाळा पोलिसांमध्ये लेखी पत्र द्वारे तक्रार दिलेली आहे. अद्याप त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने त्याचा तपास होणे व संबंधितावर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्या इमारत पडल्याने अंगणवाडी ही मंदिरात भरत आहे. याबाबत लवकरच गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास होईल.
.. आनंद जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी करमाळा

चौकट
इमारत विनापरवानगी पाडली आहे ही वस्तुस्थिती आहे. इमारत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मालकीची असल्याने त्यांच्याकडे याबाबत अहवाल दिला असून त्यांनी याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. सध्या त्यांनी पोलिसात पत्राद्वारे तक्रार दिली आहे .लवकरच तपासात सत्य बाहेर येईल.
.. मनोज राऊत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती ,करमाळा

चौकट
२१ एप्रिल रोजीच्या रात्री ही अंगणवाडीची इमारत पाडून त्यातील साहित्यासह ती गायब केली होती. याबाबत १४ एप्रिल २४ रोजी अंगणवाडी पाडणार असल्याची आपण लेखी तक्रार ग्रामविकास अधिकारी कडे दिली होती. त्यावेळी त्यांनी मला पोहच दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी मला २९ एप्रिल रोजी पोहोच दिली आहे. अंगणवाडी पाडण्याची गावांमध्ये चर्चा असताना याची आगाऊ कल्पना मी त्यांना दिली होती. यावर त्यांनी काहीच कारवाई न करता ते चुपचाप बसले. त्यामुळे अज्ञात इसमांनी ती इमारत एका रात्रीत भुईसपाट करून अंगणवाडी ची विल्हेवाट लावली. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. स्वतःची इमारत भुईसपाट केल्याने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना इतरत्र बसावे लागत आहे. याचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक आहे .यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
..सोमनाथ जाधव , तालुका उपाध्यक्ष, प्रहार संघटना, झरे, तालुका करमाळा.

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

14 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

15 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

3 days ago