करमाळा प्रतिनिधी
कुगाव ता. करमाळा ते काळाशी ता. इंदापूर यादरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडाल्यामुळे धरणावरील जलवाहतूक बंद करण्यात आली होती, परंतु उजनी धरण काठालगत असणारी करमाळा व इंदापूर तालुक्यातील गावांची यामुळे खूप मोठी अडचण होत होती. या दोन्ही तालुक्याला जोडण्यासाठी नव्याने महायुती सरकारने पूल मंजूर केला असून त्याचे कामे सुरू होण्यास अवधी आहे. दरम्यान या दोन तालुक्यातील दळणवळण व्यवस्थित व्हावे यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मध्यस्थीने उजनी धरणावरील जलवाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली असून लवकरच यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती कुगाव दूध संस्थेचे चेअरमन सचिन गावडे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की करमाळा व इंदापूर तालुका उजनीकाठावरील नागरिकांनी आज आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन तेथील नागरिकांच्या व्यथा बोलून दाखवल्या. त्यावेळेस तत्परतेने आमदार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार, करमाळा व इंदापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक, उजनी धरण व्यवस्थापन भीमानगरचे मोरे साहेब, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण चे साळे यांना तात्काळ फोन करून याविषयी तोडगा काढण्याचे सुचविले. त्यास अनुसरून विद्यार्थी तसेच रुग्ण अशी अत्यावश्यक बाब लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात लाईफ जॅकेटचा वापर करून जलवाहतूक करण्यास मान्यता दिली त्यामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तात्पुरता प्रश्न सुटला असून या याविषयी कायमस्वरूपी मार्ग काढला जाणार असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील उजनी धरणकाटा लगतचे नागरिक समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. ही जलवाहतूक सुरू होण्यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांचेही विशेष प्रयत्न असून त्यांच्या माध्यमातूनही इंदापूर तालुक्यातील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…