Categories: करमाळा

एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा- प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात विकासाचा महापूर महाराष्ट्रात आणला असून शासनाचा पैसा कष्टकरी शेतकरी शेतमजूर महिला यांच्यापर्यंत पोहोचवला आहे देशात एक नंबरचे राज्य करण्यासाठी महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावी असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे यांनी केले.करमाळा येथे बांधकाम 401कामगारांना दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 43 लाख रुपये किमतीचे भांडी संसार उपयोगी साहित्य वाटण्यात आले.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटेयुवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,तालुकाप्रमुख राहुल कानगुडे,शहरप्रमुख संजय शीलवंत जेऊर चे  शहर प्रमुख बाळासाहेब करपे माधव सूर्यवंशी,युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंडनागेश शेंडगे संजय जगताप प्रदीप बनसोडे शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट शिरीष लोणकर, उद्योजक संतोष गुगळे निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी 2800 बांधकाम कामगार नोंदणी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेनेच्या माध्यमातून आठ हजार पाचशे कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.यावेळी बोलताना प्राध्यापक ज्योतीताई वाघमारे म्हणाले की लाडकी बहीण मोफत एसटी प्रवास पिक विमा अनुदान मोफत लाईट शेतकऱ्यांना मोफत वीज पीक लागवडीसाठी अनुदान अशा अनेक योजना थेट शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या निर्माण केले आहे.

करमाळ्यातूनही शिवसेनेचा उमेदवार निवडून देणे काळाची गरज आहे.एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण म्हणून तालुक्यातील प्रत्येक महिलेने करमाळ्यातून शिवसेनेचा धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान केले.यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातपात धर्म न मानता सर्वसामान्य नागरिक डोळ्यापुढे ठेवून काम करतात.एकनाथ शिंदे साहेब शंभर टक्के समाजकारण करतात यामुळे राजकारण करताना त्यांना कोणता त्रास होत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा चेहरा झाला असून सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणारा नेता म्हणून त्याची खाती संपूर्ण राज्यात झाली आहेयेणारा महाराष्ट्राचा भविष्यकाळ उज्वल करायचा असेल तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे त्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे असे आवाहन केले.

+++++
रोहिणी फंड
लाभार्थी स्वयंपाक साहित्य
भांडी संच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली भांडी अत्यंत मजबूत असून किमान वीस वर्षे त्याला वापरले तरी ते खराब होणार नाही यामध्ये कुकर पाण्याची टीप पाच डबे पाच ते आठ पाच चमचे कढई सह स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य असून या साहित्याची बाजारात किंमत दहा हजार आठशे रुपये आहे हे साहित्य मला मोफत मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला आता 1500 रुपये महिन्याला मिळणार असून माझ्या बचत गटाला दोन लाख रुपयांचे विना व्याजाचे कर्ज मिळाले आहे.
या शासनाच्या योजना मुळे आता मी स्वावलंबी झाली आहे *++++++////

महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख

करमाळा तालुक्यातील रुग्णांना आतापर्यंत एक कोटी तीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळून दिली आहे विविध शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची थेट आर्थिक मदत सर्वसामान्यांना मिळून दिली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळ्यातील शिवसेनेच्या कार्यालयातून राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती व मोफत अर्ज भरून दिले जातात याचा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

10 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago