यावेळी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा देश वाचवा, सुंदर माझे गाव स्वच्छ माझे गाव ,पाणी वाचवा जलसंवर्धन करा असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी नको पांडुरंग मला सोन्याचे चांदीचे दान रे! फक्त भिजव पांडुरंग हे तहानलेले रान रे!! कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू! ढगाला थोडे हलवून भिजव माझे गाव तू! असे विविध अभंग बोलत पालखी सोहळा साजरा करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई ,तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन गळ्यात माळा विविध संतांची वेशभूषा करून गावात दिंडी काढण्यात आली.
हा बालगोपालांचा सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे बुधवंत सर, खान सर, कुलकर्णी सर, चव्हाण सर, पाटील मॅडम, यादगिरी मॅडम, तांबोळी मॅडम व शिक्षक सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील पालक वर्ग, गावातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…