करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांचे गंभीर प्रश्न सुटलेले नाहीत….जेऊर ते कुगाव या रस्त्याच्या गंभीर प्रश्नी सोमवारी जेऊर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन … सर्व पक्ष , संघटना मधील नागरिकांनी गट – तट बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांचे आवाहन करण्यात आले आहे.करमाळा तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खूप खराब अवस्थेत असून नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे . रस्त्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . मौजे -जेऊर ते कुगाव दरम्यानच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मंजूर रस्त्याच्या गंभीर प्रश्नासंबंधी प्रशासनाला जाग आणण्यासाठी जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि . २२ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता नगर -टेंभूर्णी बायपास रोडवर शेटफळ (ना ) , चिखलठाण नं .१ , चिखलठाण नं .२ , केडगाव, कुगाव , पोफळज आदी गावांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता मंजूर असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात मात्र होत नाही . या रस्त्यावर दिवसभर शाळकरी मुलांसह नागरिकांची वर्दळ असते . या परिसरातील १५ हजार लोकांना जेऊर, करमाळा व इंदापूर सारख्या शहरांकडे शाळा व इतर कामांनिमित्त जावे लागते . त्यांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही . कुगाव पासून सुमारे २४ किमी अंतर असलेल्या या रस्त्यावर चिखलठाण , शेटफळ , पोफळज , केडगाव इ .मोठी केळी व ऊस उत्पादन करणाऱ्या प्रयोगशिल शेतकऱ्यांची गावे आहेत याशिवाय चिखलठाण येथील श्री . कोटलिंग महाराज मंदीर व कुगाव ची हनुमान जन्मभूमी असलेले हनुमान मंदिर आदी धार्मिक ठिकाणे जोडलेली आहेत हे अंतर पूर्ण करण्यासाठी दुचाकी वरून ४५ मिनीटे ते १ तास तर चार चाकी वाहनाने १ ते १.३० तास लागत आहे . शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच रेल्वे प्रवासासाठी जेऊर येथे, शिक्षण , वैदयकिय उपचार व शासकिय कामांसाठी करमाळा येथे तसेच बोट वाहतूकीतून इंदापूर , बारामती इ . ठिकाणी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी शिकणासाठी दररोज ये -जा करतात. सध्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले आहेत त्यामध्ये पावसाळयात गढूळ पाणी व चिखल साचल्याने इतरांच्या गाड्यांनी पाणी अंगावर उडल्याने गणवेश खराब होत आहेत . शेती उद्योगासाठी डिझेल आणण्या करिता , शेतमालाची ने आण करण्याकरिता शेतकऱ्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे . इमर्जन्सी वैद्यकिय उपचारासाठी सुद्धा या रस्त्याशिवाय पर्याय नाही म्हणून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू होणे गरजेचे आहे . या गंभीर प्रश्नी वाचा फोडण्यासाठी जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . हे आंदोलन सर्व नागरिकांच्या प्रश्नासाठी असल्याने सर्व पक्ष , संघटना व सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाजार समिती संचालक युवा नेते शंभूराजे जगताप यांनी केले केले आहे . मागील १५ वर्षांपासून जेऊरकडून येणाऱ्या आमच्या गावावरून कुगाव ला जाणाऱ्या रस्त्यावर खडी वा डांबर पडले नाही . खराब रस्त्यामूळे दैनंदिन गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे . लोकांना तोंड द्यावे लागेल म्हणून लोकप्रतिनिधी या भागात फिरकत सुद्धा नाहीत . तात्काळ रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आम्ही येणाऱ्या निवडणूकीत बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत – दादासाहेब लबडे , संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती , करमाळा चौकट – आमच्या चिखलठाण नं . १ या गावातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते . रस्त्याच्या खराब होण्यामुळे लहान -थोरां सह सर्वांनाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे . लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार संजयमामा शिंदे यांनी एक महिन्याच्या आत रस्त्याचे काम सुरू करू असे आश्वासन दिले होते . पण ते केवळ पोकळ आश्वासन होते असे वाटते . लवकरात लवकर रस्ता पूर्ण व्हावा अन्यथा आमचे यूवा नेते शंभूराजे जगताप यांचे नेतृत्वा खाली आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्यासाठी अजून तिव्र आंदोलन करू . . – संदीप उर्फ बाबुराव सरडे युवा नेते , जगताप गट चिखलठाण नं .१ हनूमान जन्मभूमी कुर्मग्राम अर्थात कुगाव हे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे . याशिवाय केळी उत्पादनासाठी हा परिसर आपली ओळख निर्माण करत आहे परंतू खराब रस्त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने केळी निर्यातीसाठी मर्यादा येत आहेत . या परिसरात व्यापारी दृष्टीकोणातून भौतिक सुविधा सुधारण्याची गरज आहे . -महादेव कामटे संचालक , कृषी उत्पन्न बाजार समिती चौकट -लहान मुलांसह , महिलांच्या प्रसुतीसाठी तात्काळ मोठ्या दवाखान्यात नेणे आवश्यक असते . रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पेशंट ना इमर्जन्सी हॉस्पीटल मध्ये नेण्यास मर्यादा येत आहेत . – डॉ . श्रीकृष्ण जगताप सामाजिक कार्यकर्ते , चिखलठाण नं. २ चौकट – रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आमच्या केडगाव गावातील नागरिकांचे दररोज हाल होत आहेत . शाळकरी मुला -मुलींना व सामान्य नागरिकांना दररोज या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे आमचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाला लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करायला भाग पाडू अन्यथा येत्या निवडणूकीवर समस्त गावकऱ्यांना सोबत घेऊन बहिष्कार टाकु . – शुभम बोराडे युवा सामाजिक कार्यकर्ते ,केडगाव