करमाळा प्रतिनिधी- करमाळा येथे लघु पशुचिकित्सालय (वेटरनरी पॉली क्लिनिक) तातडीने होणे बाबत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या संचालिका नेत्या रश्मी दिदी बागल यांनी राज्याचे पशुसंवर्धन व महसुल मंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना पत्राद्वारे विनंती केली. असल्याची माहिती यांनी आज येथे दिली. याबाबत अधिक बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की करमाळा येथे लघु पशू चिकित्सालय होण्याबाबत पशुपालक शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी आहे. पशुधन आजारी पडल्यास पशुधनाला योग्य त्या रक्त तपासणी सोनोग्राफी अशा सुविधांची आवश्यकता आहे. परंतु अशा सुविधांनी युक्त लघु पशु चिकित्सालय करमाळा येथे नाही त्यामुळे करमाळा तालुक्यातल्या पशुपालक शेतकऱ्यांना आपले पशुधन घेऊन करमाळा तालुक्याच्या बाहेर किंवा एखाद्या शहरात जावे लागते. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातो व नाहक त्रास होतो सन 2019 च्या पशुधन जनगणनेनुसार तालुक्यामध्ये गाय बैल 64 हजार 36 ,रेडे म्हैस 27 हजार 464 ,शेळ्या 52 हजार 224 मेंढरे 6130 आणि वारांची संख्या 466 असे एकूण एक लाख 50 हजार 260 इतके पशुधन आहे त्यामुळे पशुधनाची संख्या विचारात घेता करमाळा येथे पशुधनावरील उपचारासाठी क्ष किरण रक्त तपासणी सोनोग्राफी अशा सुविधांनी युक्त लघु पशुचिकित्सालय होणे हे गरजेचे आहे. याबाबत नेत्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मी दिदी बागल यांनी माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना करमाळा येथे लघु पशु चिकित्सालय तातडीने उभारणे बाबत पत्र दिले असून याबाबत लवकरच कार्यवाही होईल अशी आशा शेवटी भाजपा नेत्या रश्मी बागल यांनी व्यक्त केली.