Categories: करमाळा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्षपदी अमोल पवार यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा करमाळा तालुका अध्यक्षपदी वाशिंबे गावचे माजी उपसरपंच अमोल पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड   देवळाली ता. करमाळा येथील भाजप कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यामध्ये माजी सहकार राज्यमंत्री आमदार सुभाष बापू देशमुख भारतीय जनता पार्टी जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या हस्ते पत्र देऊन शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करून करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे . जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांच्या सहकाऱ्यांने युवकाचे संघटन करून करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम वाढवणार असल्याचे अमोल पवार यांनी सांगितले. अमोल पवार हे वाशिंबे गावचे माजी उपसरपंच असून मकाई सहकारी साखर कारखान्याची संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. पश्चिम भागामध्ये भारतीय जनता पार्टी भक्कम करण्यासाठी अमोल पवार यांनी चांगले काम केल्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

32 mins ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago