Categories: करमाळा

आमदार  स़ंजयमामा शिंदे यांच्या माध्यमातुन करमाळ्यात ‘लाडक्या बहिणी’साठी मदत कक्ष सुरु…


करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबात लाभार्थींना अर्ज दाखल करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालय परिसरात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. याचे उद्घघाटन आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत आवताडे, डॉ. विकास वीर, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, गुळसडीचे दत्तात्रय अडसुळ, तुषार शिंदे, अशिष गायकवाड, सरपंच रविंद्र वळेकर, भोजराज सुरवसे, देवा लोंढे, हरीकाका वळेकर, ब्रह्मदेव राख, आदिनाथ मोरे, आळजापूरचे युवराज गपाट, राष्ट्रवादीचे अश्पाक जमादार, अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शितल क्षिरसागर, तालुका उपाध्यक्ष स्नेहल अवचर, रुपाली अंधारे, नंदीनी लुंगारे, पल्लवी रनशुंगारे आदी उपस्थित होते.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही सरकारने 1 जुलै 2024 पासून घोषणा केलेली योजना आहे.यामध्ये लाभार्थी महिलेला महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. हा अर्ज दाखल करताना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता यावी म्हणून तहसीलच्या परिसरातच हा मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे.
आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून सुरुवातीपासून महिलांसाठी ऑफलाईन अर्ज मोफत वितरित केले गेले आहेत .आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी या मदत कक्षाचा उपयोग होणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago