Categories: करमाळा

स्वच्छता ही आरोग्याची जननी असून करमाळा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन आरोग्य संपन्न जीवन जगावे – प्राध्यापक रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी स्वच्छता ही आरोग्याची जननी असून नागरिकांनी स्वच्छतेचा मोहिमेत सहभागी होऊन करमाळा शहर स्वच्छ व सुंदर करून आरोग्य संपन्न जीवन जगावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे . करमाळा शहरातील एसटी बस स्थानक परिसरात अस्वच्छता घाणीचे साम्रज्य पसरले होते. प्रचंड अस्वच्छता कचऱ्याचे ढीग व दुर्गंधीमुळे बस स्थानकामध्ये रोगराईचे वातावरण निर्माण झाले होते. करमाळा आगारातील बंद पडणाऱ्या एसटीबाबत त्यामुळे होणाऱ्या गैरसौयीबाबत एसटी आगारप्रमुखाशी चर्चा करून यावर उपाय योजना करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी बस स्थानकाला भेट दिल्यानंतर करमाळा बस स्थानक व परिसर अस्वच्छ असल्याने प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने 23 जुलै रोजी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला होता.त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर सचिवा सौ .मायाताई झोळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर बस स्थानक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .या स्वच्छता मोहिमेमध्ये शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, करमाळा बस स्थानकाचे आगार प्रमुख विरेंद्र होनराव, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, अंजनडोचे माजी उपसरपंच शहाजी माने रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुहास काळे पाटील, भाग्यश्री गरड मॅडम प्राध्यापक राजेश गायकवाड,काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, काँग्रेस आयचे उपाध्यक्ष आनंद झोळ या सर्वांनी सहभागी होऊन संत गाडगे बाबाचा स्वच्छतेचा मूलमंत्र अवलंब करून हाती झाडू घेऊन करमाळा बस स्थानक व परिसराची स्वच्छता केली. याचबरोबर रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक पावडर ही टाकण्यात आली. आजच्या युगामध्ये प्रत्येक जण व्यवस्थेबद्दल सुविधेबाबत अडचणींबाबत तक्रार करतो पण जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपले कर्तव्य बजावतो का याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. करमाळा बस स्थानक स्वच्छतेबाबत प्राध्यापक रामदास झोळसर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. मायाताई झोळ मॅडम यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना नागरिकांना बरोबर स्वच्छतेचे हे अभियान सुरू केले आहे. प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने स्वच्छतेचा हा उपक्रम राबवल्याबद्दल प्रवासी व नागरिकांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमाला व कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.करमाळा बसस्थानक परिसर स्वच्छतेचे हे अभियान प्रत्येक आठवड्याच्या दर रविवारी सुरू राहणार असून करमाळा शहरातील सुजाण नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन करमळा शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे . *करमाळा शहर बस स्थानक स्वच्छतेचा संकल्प प्राध्यापक रामदास झोळसर यांनी केला होता त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे करमाळा बस स्थानक स्वच्छतेचा उपक्रम ‌ कौतुकास्पद असून आमच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रशासनाच्यावतीने आम्ही ज्या व्यक्तीला स्वच्छतेची टेंडर दिले आहे त्यांना सक्त ताकीद देऊन करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ राखण्यासाठी योग्य व्यक्तीला स्वच्छतेचे टेंडर देण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.करमाळा बस स्थानक स्वच्छ मोहीम राबवल्याबद्दल प्राध्यापक रामदास झोळसर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा रामदास झोळसर त्यांच्या धर्मपत्नी सौ मायाताई झोळ मॅडम यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. प्रशासनाच्यावतीने करमाळा बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

1 day ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

2 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

2 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

5 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

6 days ago