करमाळा प्रतिनिधी केंद्रीय अर्थ संकल्पात महाराष्ट्राला कमी निधी देऊन एन डी ए सरकारने लोकसभेतील महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचा राजकीय सूड उगवला असून अशा द्वेष भावनेतून मंजूर झालेल्या अर्थ संकल्पाचा करमाळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट ) यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल तहसीलदार यांना निवेदन देऊन अर्थ संकल्पात झालेल्या अन्याया बद्दल रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात भोपळे दाखवून व घोषणा बाजी करत तहसील आवारातील परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष संतोष वारे, सभापती अतुलभाऊ पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी डॉक्टर अमोल दुरंदे, माजी सरपंच महादेव पोरे, बहुजन संघर्ष सेना संस्थापक राजाभाऊ कदम, कृ ऊ बा संचालक बाळासाहेब पवार, सरपंच राजाभाऊ भोसले, संजय फडतरे दत्तात्रय देशमुख, सचिन नलवडे, गणेश पाटील, वैभव पाटील, रामेश्वर तळेकर, सरपंच दादासाहेब भांडवलकर, सुरज बोराडे,राहुल गोडगे, संदीप मारकड, राहुल उरमडे, विनोद गरड, आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की केंद्र सरकारच्या तिजोरीत जी एस टी माध्यमातून सर्वाधिक कर हा महाराष्ट्रातून जातो. तरीही विकास कामांच्या निधीसाठी मुंबई आणि राज्यासाठी अत्यंत कमी निधी देण्यात आला आहे. या उलट ज्यांच्या कुबड्या घेऊन एन डी ए सरकार आज देश चालवीत आहे त्या टी डी पी आणि राष्ट्रीय जनता दलास आंध्र प्रदेश आणि बिहार साठी मात्र लाखो कोटींचा निधी दिला गेला. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या एकत्रित प्रयत्नातून आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून त्यावेळी निश्चितच राज्यातील शेतकरी, युवक, महिला, नोकरदार, वृद्ध आणि पेन्शनर या सह सर्वाना न्याय मिळेलच. पण तूर्तास आपण केंद्र सरकारच्या या पक्षपाती वागण्याचा निषेध करत असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…