Categories: करमाळा

नियोजित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधी वितरणाचा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला आदेश- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध होणे संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून महाराष्ट्र शासनाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला निधी वितरण करण्याचा आदेश क्र. व्हीआयपी-२०२४/प्र.क्र १२१/२४)/जसंअ
दि. २५.०७.२०२४ नुसार काढण्यात आल्यामुळे आता सदर योजनेच्या टेंडरची प्रक्रिया मार्गी लागणार आहे.
आ.संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केलेली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आ. शिंदे यांनी 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली .त्यानुसार शासनाकडून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला सर्वेक्षणासाठी निधी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत.

अशी असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना…
आमदार संजयमामा शिंदे यांची संकल्पनेनुसार प्रस्तावित केलेली कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.
टप्पा 1 –
रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
टप्पा 2 –
या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 1800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्‍वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत .सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

10 hours ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

2 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

2 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

3 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago