Categories: करमाळा

करमाळा पूर्व व करमाळा पश्चिम अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना रश्मी बागल यांचे निवेदन

करमाळा (प्रतिनिधी)- करमाळा तालुक्याचा भौगोलिक विस्तार व वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करमाळा तालुक्यामध्ये करमाळा पूर्व व करमाळा पश्चिम अशी दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र देऊन विनंती केली असून याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात येईल अशी माहिती भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका रश्मी दिदी बागल यांनी आज बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती देताना रश्मी बागल म्हणाल्या की करमाळा तालुका हा भौगोलिक दृष्टीने मोठा तालुका असून अंदाजे करमाळा ते जिंती 45 किलोमीटर, कंदर 40 किलोमीटर , तर करमाळा ते वरकुटे 27 किलोमीटर व जातेगाव बॉण्ड्री 15 किलोमीटर अशा पद्धतीने करमाळा तालुक्याच्या सीमारेषा आहेत. तसेच करमाळा शहराची ही जबाबदारी करमाळा पोलीस स्टेशन वरच आहे. करमाळ्याची वाढती लोकसंख्या गुन्हेगारीचे प्रमाण महिलांवर होणारे अत्याचार अन्याय सायबर गुन्हे चोरीच्या घटना दुचाकी चोरीच्या घटना फसवणुकीच्या घटना या पाहता गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून सध्याचे करमाळा पोलीस स्टेशन येथे असलेली कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व कमी पोलीस बल यामुळे या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे व गुन्ह्यांचा तपास लावण्याकामी बराच कालावधी जात आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये करमाळा पूर्व व करमाळा पश्चिम अशी दोन नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थित हाताळला जाईल, व कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर पोलिसांवरचा वाढता ताण व कामाचा व्याप पाहून दोन स्वतंत्र पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे. करमाळा तालुक्यातील रेल्वे मार्गाची सुरक्षेची ही जबाबदारी करमाळा पोलीस स्टेशन वरच असते तसेच करमाळा पोलीस कार्यालयास आधुनिक पद्धतीची वाहने शासनाने देणे गरजेचे असून वाहनांची अपुरी संख्या असल्यामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वाहतूक साधने अपुरी पडत आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून करमाळा पोलीस स्टेशनची इमारतही सध्याच्या तहसील कार्यालयाच्या आतील बाजूस आहे ही इमारत ब्रिटिशकालीन असून सध्याची कामाची व्याप्ती पाहता पोलीस निरीक्षक व इतर सहाय्यक अधिकाऱ्यांना स्वतंत्र केबिन असणे गरजेचे आहे. त्याकरिता सध्याची इमारत अतिशय अपुरी पडत आहे. त्यामुळे करमाळा पोलीस स्टेशनला नवीन इमारत बांधणे गरजेचे असून करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जी सध्याची वसाहत पोलीस लाईन येथे आहे. त्याची दुरावस्था झाली असून कर्मचाऱ्यांना स्वतंत्र पोलीस क्वार्टर्स व नवीन अत्याधुनिक पोलीस स्टेशनची इमारत बांधणे गरजेचे आहे. याबाबतही माननीय उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असता नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे व नवीन कर्मचारी वसाहत व नवीन पोलीस कार्यालय इमारत याकरता सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तातडीने प्रस्ताव दाखल करण्याबाबत तातडीने मागवून घेऊ असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती शेवटी रश्मी बागल यांनी यावेळी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago