Categories: करमाळा

तपश्री प्रतिष्ठान ,गोसेवा समिती ,दत्त पेठ तरुण मंडळ ,व बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार , दिनांक 27 जुलै रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान ,गोसेवा समिती ,दत्त पेठ तरुण मंडळ ,व बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार , दिनांक 27 जुलै रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व परमेश्वर बोडगे त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रतिष्ठित व्यापारी अनिलशेठ सोळंकी, बाळासाहेब महाजन, उद्योजक रोहित वाघमारे , भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी,नितीन दोशी,दिनेश मुथा, वैभव दोशी आशिष बोरा,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत सुमारे 4700 च्या पुढे रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले.आजच्या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 27 रुग्ण ऑपरेशन साठी पुणे येथे रवाना होणार आहेत .प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला दत्त मंदिर , दत्त पेठ येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष अनिलशेठ सोळंकी यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. शिगची काकींजी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.बाळासाहेब महाजन यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
शिबिरासाठी गुलाम गोस,संतोष भांड, दत्त मंदिर चे पुजारी श्री . कुलकर्णी, चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शहा, शशि अप्पा ननवरे,आदित्य कुळकर्णी, सतीश शिंदे यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत खाटेर यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

8 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

11 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

1 day ago