करमाळा प्रतिनिधी
राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना सामाजिक कार्यात आघाडीवर राहून हे काम करताना सर्व पक्षातील मित्र मंडळाला बरोबर घेऊन समाजाचे प्रश्न सोडवता येतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे अध्यक्ष करमाळा तालुका भरत अवताडे यांनी व्यक्त केले.शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते भरत अवताडे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी सुभाष अण्णा सावंत गटाचे नेते श्री सुनील बापू सावंत युवा नेते मानसिंगराव खंडागळे,उद्योगपती दिनेश घोलप,प्राध्यापक अशोक नरसाळे,पत्रकार नासिर कबीर नागेश राव चेंडगे पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील ,जेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचे युवा सेना जेऊर शहर प्रमुख महादेव सूर्यवंशी,रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाणआधी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक नरसाळे म्हणाले की माणसाला आयुष्यात चार जीवाचे मित्र पाहिजे आहेत की अशा मित्रांजवळ आपण सगळ्या गोष्टी अडचणी शेअर करू शकतो.अन्यथा मानसिक दबाव वाढू शकतो.भरत अवताडे यांनी प्रत्येक गटातटात आपले मित्र तयार केले आहेत.यावेळी बोलताना पत्रकार नासिर कबीर म्हणाले की भरत आवतडे अनेकांना मदत करतात पण त्याचे प्रसिद्धी करत नाहीत.यावेळी अआताडे म्हणाले की माझे सर्व गटातटात मित्र आहेत राजकारण वेगळे मैत्री वेगळी मी जपत आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रचंड समाजसेवेची जाळ उभे राहिले आहे याचा मला अभिमान आहे.यावेळी जुनी आठवण सांगताना भरत अवताडे म्हणाले की माझा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झालाव माझे कुटुंब लहानपणी गावातील भिक्षेकरी लोकांनी गोळा केलेले पीठ विकत आणून उपजीविका करत होतो.लहानपणी आईचे निधन झाले यामुळे मी अत्यंत अडचणी काम करत एक यशस्वी उद्योजक झालो आहे.माझ्या कंपनीत 100 तरुणांना मी रोजगार दिला आहेया पुढील काळात सुद्धा माझ्या ठेकेदारी व्यवसायातून प्रत्येकाला बरोबर घेऊन प्रगती करणार असल्याचे सांगितले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…