Categories: Uncategorized

कार्यकर्त्याचे असलेले प्रेम हीच माझ्या राजकीय जीवनाची शिदोरी असून भरतभाऊ आवताडे ॲड अजित विघ्ने यांचे कार्य प्रेरणादायी त्यांना योग्य संधी देऊन जनता जनार्दनाचे कल्याण करण्यासाठी कटिबद्ध -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी कार्यकर्त्याचे असलेले प्रेम हीच माझ्या राजकीय जीवनाची शिदोरी असून भरतभाऊ आवताडे ॲड अजित विघ्ने यांना ‌ पाठबळ देऊन योग्य संधी देऊन जनता जनार्दनाचे कल्याण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे करमाळा तालुक्याचे विकास प्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका अध्यक्ष उद्योजक भरत भाऊ अवताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते एडवोकेट अजित विघ्ने यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयामध्ये भरत भाऊ अवताडे एडवोकेट अजित विग्ने यांचा मानाचा फेटा हार श्रीफळ देऊन तसेच केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की भरत भाऊ अवताडे यांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे समाजकारणातून राजकारण करीत शिंदे गटाची पूर्व भागामध्ये ताकद वाढवण्याचे काम त्यांनी केले असून त्यांच्या कार्याची दखल भविष्यात नक्कीच घेऊन राजकारणात त्यांना योग्य संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य जनता यांच्या हा विकासाचा केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य जनतेची कामे करून एडवोकेट अजित विघ्णे यांनीही पश्चिम भागामध्ये शिंदे गटाची चांगली फळी उभारण्याचे काम केले आहे. त्यांचे सर्वसामान्यांची असलेली प्रेम समाजकारणातुन राजकारण करण्याची असलेली भूमिका नक्कीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी यशदा ही ठरणार आहे. भविष्यामध्ये त्यांनाही आपण योग्य राजकीय संधी देणार असल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले. या ‌ सत्कार समारंभास मा.जि.प सदस्य उद्धव दादा माळी सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत,  प्रवीण शिंदे उर्फ बंडा गुरुजी सुजीत तात्या बागल,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने, सरपंच किरण फुंदे, आमदार संजयमामा शिंदे यांचे सहाय्यक डॉक्टर विकास वीर, दादासाहेब सावंत, बाबर  सर ,मोरे अण्णा भोसे चे माजी सरपंच भोजराज सुरवसे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, देवळाली मा सरपंच आशिष गायकवाड, गौतम ढाणे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजिंक्य पाटील, सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र पवार, बापू तांबे , सुरज ढेरे , अमोल चाळक ,उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago