करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचा चोपडे वपवार कुटुंबाच्यावतीने सत्कार करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुकयाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले असून अभ्यासू संस्कृत कर्तृत्ववान नेतृत्व असणारे संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार विवेकराव येवले यांनी व्यक्त केले. आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडे व पवार कुटुंबाच्यावतीने करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचा 31 जुलै रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने करमाळा येथील पुणे येथे स्थायिक असलेले देविदास चोपडे यांचे सुपुत्र व उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विजयराव पवार यांचे जावई ॲड रोहन देविदास चोपडे यांच्या हस्ते आमदार संजयमामा शिंदे यांच्या 31 जुलै रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पुढे बोलताना जेष्ठ पत्रकार विवेकराव येवले म्हणाले की प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा सर्वसामान्य जनतेशी असणारा जिव्हाळा प्रेम आपुलकी म्हणून आपल्या हक्काचा माणूस म्हणून जनतेच्या मनामध्ये संजयमामा शिंदे यांनी अढळ स्थान प्राप्त केले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कुठल्या गटाचा तटाचा हा विचार न करता करता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले असल्याचे जेष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी सांगितले.यावेळी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते विजयराव पवार ज्येष्ठ पत्रकार विवेकराव येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य भैय्या पाटील अभंग साहेब उपस्थित होते.