Categories: करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी केला पाटील गटात जाहीर प्रवेश

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला असून आगामी विधानसभा निवडणुकीत माजी आमदार नारायण आबा पाटील यांना परत एकदा आमदार म्हणून विजयी करण्यासाठी संजय गुटाळ यांचेसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी निर्धार केला आहे. आज पांगरे नजीक लोकविकास डेअरी फार्म जवळील सांस्कृतिक सभागृहात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्वतः माजी आमदार नारायण आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर व्यासपीठावर कंदरचे सरपंच भास्करराव भांगे, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, सभापती शेखर गाडे, चंद्रकांत पारेकर, भाऊसाहेब टेकाळे, बाजार समितीचे माजी संचालक बाबासाहेब बोरकर व शहाजीराव राऊत, माजी पंचायत समितीचे सदस्य जयराम सोरटे, नरहरी दोन्ड, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, विनोद महाडिक, नितीन पारेकर, संतोष बापू पाटील, अमोल पाटील, पप्पू टेकाळे, संतोष गुटाळ, नागनाथ शेंडगे, अमोल पवार, गहिनीनाथ गुंजाळ, संतोष गणगे, तुषार पाटील, अनिल सातव, माजी उपसरपंच संतोष कोपनर, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड सर, बाबासाहेब कोपनर आदिसाह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की संजय गुटाळ यांच्या प्रवेशाने तालुका विकासाला बळकटी मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत युवकांच्या हाती सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे. करमाळा मतदार संघातून युवकांचा आपणास फार मोठा पाठिंबा मिळत आहे. मला मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हवी असून आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट असून यात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच नियोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर आपला पक्ष म्हणजेच नारायण आबा पाटील होय, आबासाहेब यांना आमदार केल्यानंतरच आपण सत्कार स्वीकारणार अथवा फेटा बांधणार असल्याचा निर्धार आदिनाथ कारखाना प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ यांनी बोलून दाखवला. तसेच कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या नावा शिवाय आदिनाथ कारखान्याचा इतिहास कधीच पूर्ण होत नाही. यामुळे आदिनाथ करगण्यास उर्जित अवस्था आणण्यासाठी नारायण आबा पाटील यांनी आता पुढाकार घ्यावा. आगामी विधानसभा निवडणुकीत मतपेटितून आपण आपले जबाबदारी पार पाडळी हे दाखवणार असून पांगरे परिसरातून नारायण आबा पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देणार असल्याचे संजय गुटाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पांगरे आणि परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago