Categories: करमाळा

करमाळा तालुक्याचा पायाभूत विकास करणारा जनसामान्यांच्या मनातला नेता – आमदार संजयमामा शिंदे. – डॉ.विकास वीर.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी प्रारंभीच्या काळात करमाळा तालुक्याचेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व कै.नामदेवराव जगताप यांनी केले.त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात तालुक्याला सर्वच क्षेत्रात जी दिशा मिळाली होती ती त्यांच्या पश्चात तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारांना टिकवून ठेवता आली नाही याउलट ती जास्तच रसातळाला गेली.जिल्ह्याच्या राजकारणात आसलेला करमाळा तालुक्याचा दबदबा कै.नामदेवराव जगताप यांच्यानंतर संपला. त्यानंतर बाहेरच्या तालुक्यातील नेतेमंडळींनी करमाळ्यातील लोकप्रतिनिधींचा रीमोट कंट्रोल सतत आपल्या हातात ठेवून त्यांना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत ठेवण्यात धन्यता मानल्यामुळे तालुक्याचा विकास थांबला.पूर्णपणे थांबलेला करमाळा तालुक्याचा पायाभूत विकास कै.नामदेवराव जगताप यांचेनंतर 2019 साली आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुन्हा सुरू झाला.
विकास ही चिरंतन आणि निरंतर चालणारी प्रक्रिया असते .कोण्या एका लोकप्रतिनिधीने जादूची कांडी फिरवली आणि लगेच मतदार संघाचा कायापालट झाला असं कधीच घडत नसतं ,परंतु मतदारसंघाच्या उभारणीसाठी ज्या काही पायाभूत सुविधा असतात त्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, तालुक्याची ओळख जिल्ह्यात, राज्यात निर्माण करणे ,ऐतिहासिक वारसा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे,तालुक्याची अस्मिता जपणं हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य असतं. विशेषतः रस्ते, पाणी , वीज, शिक्षण,आरोग्य, प्रशासकीय इमारती, ऐतिहासिक वारसा असलेली तीर्थक्षेत्रे, गड ,कोट ,किल्ले यांचे जतन व संवर्धन करणे या बाबतीमध्ये मूलभूत आणि भविष्यकालीन नियोजन डोळ्यापुढे ठेवून लोकप्रतिनिधींनी काम करणे अपेक्षित असतं या निकषावरती आमदार संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व अगदी कसोटीवरती उतरताना दिसते.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या करमाळा शहराकडे व ग्रामीण भागातील ऐतिहासिक वास्तूंकडे सर्वच लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आपल्याला दिसते.आमदार शिंदे यांनी मात्र या बाबींकडे लक्ष देताना याचे संवर्धन आणि विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची तरतूद केलेली दिसून येते. करमाळा शहरातील सर्वच प्रशासकीय कार्यालयांच्या इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत.प्रशासकीय संकुल बांधकामासाठी तब्बल 34.68 कोटी निधी,सहाय्यक निबंधक कार्यालयासाठी 2 कोटी निधी,करमाळा नगरपरिषद इमारत,सांस्कृतिक सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बांधकाम यासाठी 10 कोटी निधी, किल्ला संवर्धनासाठी 2 कोटी, कमला भवानी मंदिर विकासासाठी 4 कोटी, ग्रामीण भागांतील चिखलठाण ,संगोबा ,अवाटी, शेटफळ इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 5 कोटी निधी ही कामे मंजूर आहेत. तर नव्याने कमलाभवानी मंदिर विकासासाठी 5 कोटी, करमाळा शहरांतर्गत रस्ते विकास आराखड्यासाठी 72 कोटी व करमाळा शहर उजनी धरणावरून नवीन पाईपलाईन साठी 87 कोटी निधी प्रस्तावित आहे.ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर करमाळा शहराचा चेहरा मोहरा निश्चितच बदललेल यात शंका नाही.
आ.शिंदे यांनी मतदारसंघातील रस्ते आणि पुल बांधकामासाठी अर्थसंकल्पात तब्बल 361 कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणलेला आहे.यामध्ये प्रामुख्याने उजनी धरणावरील डिकसळ पुलासाठी 55 कोटी निधी मंजूर असून त्याचे काम सुरू आहे .या पुलाबरोबरच उजनी धरण पात्रात पोमलवाडी ते गंगावळण व गोयेगाव ते आगोती या ठिकाणी नव्याने पुल बांधकामासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल केलेले आहेत. कुगाव ते शिरसोडी या पुलाला मंजुरी मिळालेली आहे. या पुलांच्या निर्मितीनंतर उजनी धरणाच्या निर्माणासाठी ज्या लोकांनी आपल्या जमिनी, घरे दिली अशा पुनर्वसित गावठाण मध्ये राहणाऱ्या लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जेऊर ते शेटफळ चिखलठाण, कुगाव रस्ता तसेच अर्थसंकल्प व प्रधानमंत्री ग्रामसडक मधून फिसरे, हिसरे, हिवरे ,कोळगाव ,निमगाव ह, गौडरे हा रस्ता, हिवरवाडी ते दक्षिण वडगाव रस्ता , कुंभेज ते आळसुंदे रस्ता,वीट ते उमरड रस्ता, सटवाई ते नीलज बिटरगाव श्री रस्ता, रामवाडी ते कावळवाडी जिंती गेट रस्ता अशा दुर्लक्षित रस्त्यांना निधी दिल्यामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित असलेला जातेगाव ते टेंभुर्णी हा महामार्ग राज्य सरकारकडून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेला राज्य सरकारचा ना हरकत दाखला मिळवून देण्यामध्ये आमदार शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या रस्त्यासाठी 1234 कोटी 12 लाख एवढा निधी मंजूर आहे.HAM अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वाधिक 71 किलोमीटर लांबी असलेल्या सावडी ते वेणेगाव या रस्त्याला तब्बल 271 कोटी निधी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळवला आहे. या रस्त्यामुळे सावडी, राजुरी, विहाळ, पोंधवडी, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज, निंभोरे, मलवडी, केम ही 11 करमाळा तालुक्यातील गावे व उपळवटे ,दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव ही 4 माढा तालुक्यातील गावे अशी एकूण 15 गावे सोलापूर, पुणे या राष्ट्रीय महामार्गाला व नगर जिल्ह्याला हमरस्त्याने जोडली जाणार आहेत.
पाणी प्रश्नाच्या बाबतीतही आमदार संजयमामा शिंदे यांनी पायाभूत काम केलेले आहे.तालुक्यातील 104 गावातील पाणीपुरवठा योजनांसाठी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून जवळपास 95 कोटी 88 लक्ष निधी मिळवला असून मंजूर कामांपैकी 50 टक्के कामे पूर्ण पूर्णत्वास गेली आहेत. सलग 5 वर्षे सातत्याने दहिगाव उपसा सिंचन योजना चालवून आमदार शिंदे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.वर्षातील 365 दिवसांपैकी सरासरी 250 दिवस खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये दहिगाव योजना चालवल्यामुळे या योजनेबद्दलचा विश्वास तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांमध्ये निर्माण झाल्यामुळे आज दहिगावच्या दोन्ही टप्प्यातील सर्व गावात केळी, ऊस या बारमाही पिकांसह तरकारी व फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून जवळपास 7 हजार हेक्टर क्षेत्रावरती बारमाही पिकांची लागवड केली जात आहे. या योजनेची उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 109 कोटी रुपये मिळाल्यामुळे सर्वच कामे आता पूर्ण होणार आहेत.ही कामे बंद नलिका वितरण प्रणालीने होणार असल्यामुळे या बचत झालेल्या पाण्यामधून मतदार संघांतील इतर 14 गावे या योजनेत समाविष्ट होणार आहेत.
कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्याला पूर्ण दाबाने मिळावे यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्यानंतर कुकडी प्रकल्प धरण साखळी पासून ते करमाळा तालुक्यापर्यंत कुकडीच्या मुख्य कॅनॉलची पाहणी केली. तालुक्यातील कॅनॉलची दुरुस्ती, झाडे झुडपे काढणे आदी कामे केल्यानंतरही डिस्चार्ज मध्ये विशेष फरक पडत नाही आणि असेच पाणी माझ्या तालुक्याला मिळत राहिले तर कुकडी लाभक्षेत्रातील सर्वच गावांच्या घशाला कायमची कोरड राहणार आहे हे लक्षात आल्यानंतर आमदार शिंदे यांनी कुकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्याच्या हक्काचे 5.50 TMC पाणी उजनी धरणात सोडून ते 2 उपसा सिंचन योजना राबवून तालुक्यातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील 40 गावांना पाणी देण्याची योजना साकारण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात पत्र व्यवहार सुरू केला.आज महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये सदर योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधी मंजूर झाला असून लवकरच सदर कामाची निविदा निघून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. कुकडी प्रकल्पातील मूळ कॅनॉल मध्ये पाणी सोडण्याची ही योजना असल्यामुळे संपूर्ण योजनेला अंदाजे 424 कोटी खर्च अपेक्षित आहे. 2 उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणातील पाणी करमाळा तालुक्याच्या कुकडी लाभ क्षेत्रातील गावांना देण्याची ही योजना असल्यामुळे भविष्यात मांगी तलाव आणि मांगी तलावावरती अवलंबून असणाऱ्या 12 -13 गावांना पाणी मिळण्याचा मार्गही यामुळे सूकर होणार आहे.
कुकडी प्रकल्प व दहिगाव योजना याव्यतिरिक्त सीना नदीवरील पोटेगाव बंधारा दुरुस्तीसाठी 4 कोटी निधी मंजूर असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर सीना नदीवरील तरटगाव व संगोबा या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लातूर पॅटर्न बंधाऱ्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रस्ताव ,आवाटी येथे सीना नदीवरती बांधण्यात येत असलेला नवीन बंधारा या कामांबरोबरच जलसंधारण विभागाच्या माध्यमातून घारगाव, केडगाव ,भोसे, जातेगाव, कोर्टी, वडाचीवाडी आदी गावांमध्ये तलाव दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर ती सुरू आहे. कृष्णा – भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत उजनी धरणातून मराठवाड्यासाठी चाललेल्या 27 किलोमीटर बोगद्याचे 9 शाफ्ट करमाळा तालुक्यामध्ये आहेत. यामध्ये दहिगाव ,जेऊर, कोंढेज, सरपडोह, सौंदे, शेलगाव क ,अर्जुननगर , मिरगव्हण या शाप्ट मधून शेतकऱ्यांना पाणी उचलण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी ही आमदार शिंदे प्रयत्नशील आहेत.एकूणच पाणी या महत्त्वाच्या विषयावरती आमदार संजयमामा शिंदे पायाभूत काम सुरू आहे.
2014 ते 19 या कालावधीत करमाळ्यात एकही नवीन सबस्टेशन कार्यान्वित झालेले नसल्यामुळे 2020 साली तालुक्यातील वीज समस्येचा प्रश्न जटील होता. वीज समस्येवरती उपाय योजना करण्यास आमदार शिंदे यांना यश आले असून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आवाटी, राजुरी, रायगाव ही 3 नवीन सबस्टेशन करमाळा तालुक्यात उभा राहिली .त्यांची कामे आज प्रगतीपथावर आहेत .याबरोबरच कात्रज, कोर्टी, पांडे, कविटगाव, दहिगाव, शेटफळ, कव्हे ,म्हैसगाव ,बारलोणी या सबस्टेशनची क्षमता वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत साडे, वीट, व लव्हे येथील सबस्टेशन विस्ताराची कामे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर वांगी 2 ,ढोकरी, गुलमोहरवाडी, सौंदे, पोमलवाडी ,हिंगणी ,उपळवाटे या ठिकाणी नवीन सबस्टेशन उभा करणे व कोळगाव, झरे ,उमरड, शेटफळ, बारलोणी, चोभेपिंपरी या सबस्टेशनची क्षमतावाढ करण्याची मागणी प्रस्तावित आहे.
आरोग्य सुविधेच्या बाबतीतही तालुक्यात पायाभूत काम सध्या सुरू आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 कॉटमध्ये आमदार शिंदे यांनी रूपांतर केले आहे .त्यातील 20 बेड हे अतिदक्षता विभागाचे आहेत. या रुग्णालयासाठी 25 कोटी 20 लाख निधी मंजूर असून त्यातून कामे सुरू आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाकरिता 18 कोटी 68 लाख, कुर्डूवाडी ड्रामा केअर साठी 7 कोटी 20 लाख याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन लाईन , ऑक्सिजन प्लांट, अस्थिव्यंगाचे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप सुविधा , सिझेरियन ची सुविधा,डिजिटल एक्सरे सुविधा ,हर्निया व गर्भाशयाची पिशवी काढणे सुविधा ,कायमस्वरूपी भूलज्ञाची नियुक्ती इत्यादी सुविधा दिल्या जात आहेत. जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये प्रामुख्याने गुळसडी, उमरड ,सावडी ,वडशिवणे इत्यादी उपकेंद्रांचे बांधकाम पूर्णत्वास गेलेले आहे.स्टाफ मंजुरीनंतर तिथे आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.
करमाळ्यात वरिष्ठस्तर न्यायालय मंजूर करण्याच्या कामातही आमदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्याला मंजुरी मिळून प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झालेली आहे. शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र व्हावे याबाबतीतही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून ते लवकरच मार्गी लागेल. याचबरोबर आमदार फंड ,समाज कल्याण विभाग, दलित वस्तीचा निधी, अल्पसंख्यांक विभागाचा निधी ,जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जन सुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र ,शाळा दुरुस्ती, ३०५४,५०५४ ,गट ब चा निधी तसेच पुनर्वसन विभाग, क्रीडा विभाग या निधीच्या माध्यमातूनही प्रत्येक गावापर्यंत आमदार संजयमामा शिंदे पोहोचलेले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

राष्ट्रीय पातळीवरील साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार 2025 चे मानकरी श्री बाळासाहेब नरारे यांना पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…

43 mins ago

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

20 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

21 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago