विकास ही चिंतन चालणारी प्रक्रिया आहे. चालू पंचवार्षिक मध्ये सरकार स्थापन व्हायला लागलेला वेळ, कोविड तसेच सरकारची पाडापाडी असा काळ वजा जाता फक्त 24 महिन्यांचा काळ तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी मला मिळाला. या 24 महिन्यात जवळपास 2500 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली.हेच विकासाचे राजकारण भविष्यात टिकणारे असते.मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण भविष्यकाळात टिकणार आहे असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी बहुचर्चित मौजे – चिखलठाण नं.1 येथे कुगांव- चिखलठाण – शेटफळ – जेऊर प्रजिमा 11 या 13 कोटी 50 लाख रुपये निधी च्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा.सौ. सुनिता पाटील मॅडम,उप अभियंता मा.उबाळे साहेब,चिखलठाण गावचे माजी सरपंच मा.चंद्रकांत काका सरडे, माजी जि.प.उपाध्यक्ष,मा.राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मा.बाळकृष्ण भाऊ सोनवणे,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.सुनिलबापू सावंत,लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहासबापू निमगीरे,वाशिंबे गावचे सरपंच मा.तानाजीबापू झोळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, 2014 पासून या रस्त्याची मागणी केली जात होती. आता हा रस्ता पूर्ण होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे काम होत असल्याने 15 ते 20 दिवसात हा रस्ता पूर्ण होईल. मध्यंतरी सरकार अस्थिर होते त्यामुळे या कामाला उशीर झाला. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम करता येत नव्हते. आता हे काम पूर्ण होणार आहे.तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे मी पूर्ण करत आहे. 5 वर्षात विकासाची सगळीच प्रक्रिया पूर्ण होत नसते.मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा जो पाठपुरावा करणे आवश्यक असते ते काम मी करत आहे. त्यातूनच दहिगावसाठी सर्वात जास्त निधी आणला. डिकसळ पुलाचे कामही मी पूर्ण करत आहे. राजकारण हे विकास कामावरच टिकत असते ते कोणाच्या पुण्याईने टिकत नसते .टेंभुर्णी- जातेगाव हे काम देखील लवकरच सुरु होणार आहे.चिखलठाण ते जेऊर या रस्त्याचे काम अत्याधुनिक पद्धतीने होत असून पहिल्यांदाच ही प्रक्रिया येथे राबवली जात आहे. तालुक्यातील वीज, शेती, सिंचन, रस्ते या कामासाठी आपण प्रयत्न करत आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातून आमदार संजयमामा शिंदे गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्यामराव गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी सचिन गावडे ,विलासदादा पाटील,महेश बोराडे, रवींद्र वळेकर, सत्यवान लबडे, सुनील सावंत, राजेंद्रकुमार बारकुंड,चंद्रकांत सरडे ,सुहास गलांडे यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले. यावेळी तरडगाव चे सुदाम शेठ लेंडवे, तात्यासाहेब जाधव पाटील, अजिंक्य पाटील केडगावचे नेते मा.शंभूशेठ बोराडे,झरे गावचे युवा नेते मा.प्रशांत पाटील,मा.नागनाथ पाटील,मा.सुभाष अभंग,मा.डॉ.गोरख गुळवे,मा.संतोष गायकवाड,मा.महादेव पोळ,मा.सुजिततात्या बागल,मा.अमर भांगे,मा.पै.उमेश इंगळे,शेटफळ गावचे माजी सरपंच मा.विकास गुंड,मा शिवाजी पोळ,मा.गणेश कानगुडे,नेरले गावचे सरपंच मा.समाधान दोंड,निंभोरे गावचे सरपंच मा.रवि वळेकर, स्वप्निल पाडुळे मा.मारुती गुटाळ,मा.राजेंद्र धांडे,मा.रोहिदास सातव,मा.अशोक तकीक,मा.आशिष गायकवाड, वांगी नं.३ गावचे सरपंच मा.मयुर रोकडे,मा.सुहास नाना रोकडे,मा.सोमनाथ रोकडे,सोगांवचे सरपंच मा.विनोद सरडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा.शंकर पोळ,मा.अजिंक्य पाटील,मा.सुहास गलांडे सर,वीट गावचे माजी सरपंच मा.उदय ढेरे,केमचे युवा नेते मा.गोरख पारखे सर, तसेच गावातील जेष्ठ नागरिक मा.शामराव गव्हाणे,मा.सचिन गावडे,मा.दादा सरडे,मा.जोतीराम पवार,मा.सचिन सरडे,मा.गव्हाणे साहेब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…