करमाळा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण येथील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती धारक विदयार्थी व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा यथोचित सन्मान आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला .
निमित्त होते कुगाव ते जेऊर या रस्ता भूमिपूजन प्रसंगाचे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मान घडवून आणला. प्रत्येक विद्यार्थ्याला मानाची शाल,सन्मानचिन्ह व आमदार संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त वही भेट असे या सन्मानाचे स्वरूप होते.
धनश्री रमेश जाडकर,आदर्श ज्ञानेश्वर बोराडे हे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच सारथी शिष्यवृत्ती धारक श्रावणी मारुती गुटाळ,जानवी सुरेश गुटाळ,प्रणाली संतोष सरडे,स्नेहल शहाजी गलांडे,अक्षदा विकास सरडे,प्रणवी प्रमोद गव्हाणे,प्रणाली दिलीप सरडे,साक्षी अंगद ढवळे,प्रतिक्षा महादेव पाटील,शिवराज शरद पवार,शंभुराजे आत्माराम डोंगरे,शंभुराजे श्रीकृष्ण सुपेकर,आदर्श शंकर पाटील या विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला . शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रति वर्ष नऊ हजार सहाशे रुपये असे चार वर्षासाठी प्रति विद्यार्थी 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत तर आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 8000 ते तीन वर्ष प्रत्येकी 24 हजार रुपये मिळणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…