Categories: करमाळा

सोलापूर येथील शांतता रॅलीला जाण्यासाठी 100 चार चाकी व 100 दुचाकी गाड्यांना इंधन देणार.-प्रा.रामदास झोळ सर*

करमाळा प्रतिनिधी ‌
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे 7 ॲागस्ट रोजी शांतता रॅली होनार आहे. या रॅलीसाठी करमाळा तालुक्यातुन मराठा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत.करमाळा तालुक्यातुन मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या बांधवांना 100 चार चाकी गाड्यांसाठी डिझेल व 100 दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत ‌ देणार असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की जिल्हाभरातून तसेच जिल्या बाहेरूनही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने सोलापूर येथे दाखल होणार आहेत. आपणही बहुसंख्येने उपस्थित राहावे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणुन सोलापूर येथे शांतता रॅली काढण्यात येणार असून. सदर शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाज, बहुजन बांधव मोठ्या संख्येने जाणार आहेत. या शांतता रॅलीला जाण्यासाठी समाज बांधव मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपल्याकडून एक खारीचा वाटा म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत म्हणून करमाळा तालुक्यातील नागरिकांना 100 चार चाकी गाड्यांना इंधन व 100 दुचाकी गाड्यांसाठी पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. दुचाकी वाहनधारकांनी शक्यतो जास्तीत जास्त बुलेट गाडी आणण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे. ज्याप्रमाणे मुंबई येथील आंदोलनाला जाण्यासाठी भिगवण येथे इंधनाची सोय केली होती. त्याचप्रमाणे सोलापूरला जाण्यासाठी पुणे सोलापूर हायवे वरती इंधनाची सोय केली जाणार आहे. तरी यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील इच्छुक समाज बांधवांनी प्रा.रामदास झोळ फाऊंडेशन करमाळा संपर्क कार्यालय बारा बंगले विकासनगर करमाळा येथे संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे . संपर्क मोबाईल नं. 9405314296

saptahikpawanputra

Recent Posts

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…

18 hours ago

पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये 2 गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा. अन्यथा 26 जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

  सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…

18 hours ago

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

2 days ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

2 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

2 days ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

3 days ago