Categories: करमाळा

लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठानच्यावतीने करमाळयात 4 ॲागस्टला मराठा उद्योजक मेळावा

–करमाळा प्रतिनिधी
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी महामंडळ थेट आपल्या दारी या संकल्पनेतून लाभार्थ्यांचे प्रश्न करमाळा येथे येऊन सोडवण्यासाठी करमाळा येथे लोकमंगल नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर व सर्वोदय प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता विकी मंगल कार्यालय बस स्टँड समोर करमाळा येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यास इच्छुक ग्राहकांचा “मराठा उद्योजक मेळावा “आयोजित करण्यात आला आहे
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकमंगल नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन उपक्रम )याचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व संघटन मंत्री अभिजीत पाटील व प्रसिद्ध वक्ते माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. तरी करमाळा तालुक्यातील सर्व नव उद्योजक तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक दीपक अरुण चव्हाण व शिवाजी रामचंद्र पाटील यांनी केले आहे…

saptahikpawanputra

Recent Posts

गोमातेच्या पूजनातून गोसेवेचा संदेश; गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस उत्साहात साजरी

करमाळा  प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…

2 days ago

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

4 days ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

4 days ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

5 days ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

1 week ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

2 weeks ago