घारगाव येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या माजी सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना अखिल बोपोडी मातंग युवक संघटना पुणे या संस्थेच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे गुणगौरव पुरस्कार आज दिनांक १/८/२०२४ रोजी रुक्मिणी हॉल बोपोडी पुणे या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.
राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने गोरगरीब, अस्थिव्यंग ,मूकबधिर, मतिमंद, निराधार, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी बांधव, यांना मोलाच असं सहकार्य सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, डोळे तपासणी शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून जमेल तेवढे समाजासाठी काम करत राहणे आदी सामाजिक कामे केली आहेत याची दखल घेत अखिल बोपोडी मातंग युवक संघटना पुणे या संस्थेने सौ लक्ष्मी संजय सरवदे मा.सरपंच ग्रामपंचायत घारगाव यांना कर्तुत्ववान महिला सन्मान गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच आशा काकू देशमुखे, उपसरपंच दत्तात्रेय मस्तुद, माजी सरपंच सौ लोचना काकू पाटील, माजी सरपंच अनिता भोसले माजी उपसरपंच सतीश पवार कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलाच्या अडीअडचणीसाठी व विद्यार्थ्यांसाठी सदैव सेवा करण्याचे काम करत राहणार असे मा.सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…