Categories: करमाळा

केत्तुर  येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नुकताच जगद्गुगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग शुभारंभ सोहळा संपन्न

केत्तूर प्रतिनिधी  केत्तुर  येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नुकताच जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी माऊलीच्या नामस्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाद्य पूजन श्री व सौ उर्मिला राजाराम माने व श्री व सौ भाग्यश्री योगेश देवकते यांच्या शुभहस्ते पार पडले तर प्रतिमा पूजन श्री व सौ सत्यशीला अनिल खटके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवचन सेवा सरिता भागवत (आळंदी ) यांची सत्संग सेवा पार पडली.जाडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यदेव देवकते, नवनाथ राऊत, संजय गोसावी,अनिल खटके, दिनेश माने, मामा साळवे, पांडुरंग तरटे, विठ्ठल महामुनी यांनी परिश्रम घेतले.यावेळी मीना तरटे, राजश्री पाटील, मनीषा धुमाळ, शिवगंगा खैरे, मंदाकिनी गोसावी, सुरेखा खटके, आशा देवकते या महिलांनी विशेष सहकार्य केले. यावेळी करमाळा तालुक्यातील शेकडो भक्तगण उपस्थित होत शेवटी श्री व सौ मनीषा रामभाऊ धुमाळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली व त्यानंतर उपस्थित त्यांना महाप्रसाद देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.यापुढे प्रत्येक रविवारी या ठिकाणी रविवारी 9 वाजता सत्संग आयोजित करण्यात आला आहे. याचा विशेष लाभ घ्यावा अशी आवाहन सेवा केंद्र समितीने केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago