*करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा* करमाळा प्रतिनिधी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आपल्या प्रपंचाची होळी करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचणारे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळसर यांनी व्यक्त केले. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ०१ ॲागस्ट रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. मायाताई झोळ मॅडम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा नेते श्री गणेश मंगवडे, प्रा. राजेश गायकवाड, फाउंडेशनचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की वृक्ष हे मानवाला सावली, प्राणवायु, फळे देण्याचे काम करतात. मानवी जीवनामध्ये जसे वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठा समाजाला असेच मायेची सावली देऊन, सर्व सरकारच्या वादळाला सामोरे जाऊन खंबीरपणे उभे राहून, अनेकांना कुणबी दाखले मिळवून देऊन, त्यांच्या जीवनाचे सोने करून वटवृक्षप्रमाणे त्यांचा आधारवड बनण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात ५८ मुक मोर्चे निघाले तरीही मराठा समाजाला न्याय मिळाला नव्हता, कारण या समाजाला भक्कम खंबीर असे नेतृत्व नव्हते पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे प्रामाणिक निस्वार्थी खंबीर नेतृत्व मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आता न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य गरीब शेतकरी मराठा समाजातील मुलांना कुणबी दाखले मिळाल्यामुळे अनेक मुले नोकरीला लागून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे .जे काही समाजबांधव वंचित राहिले आहे त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी लढा चालूच आहे. हा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी समाजाने साथ देणे गरजेचे आहे. ०७ ॲागस्ट रोजी सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा केल्याबद्दल मराठा समाज बांधव या गावातील ग्रामस्थांकडून प्राध्यापक रामदास झोळसर फाउंडेशनचे कौतुक होत आहे.