करमाळा प्रतिनिधी
गेल्या वर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणात अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता .याच पाणी साठ्यावरती गेल्या वर्षी पाणीपुरवठा झाल्यामुळे धरण -60 टक्के पर्यंत गेलेले होते .यावर्षीही करमाळा तालुक्यात अद्यापही सर्वसमान पाऊस झालेला नाही. विशेषतः दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी आपण यापूर्वीच कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे केली होती.काल जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर पाणी सोडण्यास मान्यता दिली असून उद्या दिनांक 5 ऑगस्ट पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उजनी धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्याने संततधार पाऊस सुरू असून उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आह.त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना तसेच बोगदा यांनाही पाण्याचे आवर्तन उद्यापासून सुरू होणार असून त्याचा फायदा खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच बारमाही पिकांसाठी शेतकऱ्यांना होणार आहे.
चौकट –
दहिगाव उपसाच्या पट्ट्यात केळी लागवड वाढणार –
नव्यानेच करमाळा तालुक्याच्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉल पट्ट्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती ,परंतु गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका या भागांनाही बसला त्यामुळे केळी बागांची लागवड होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र ऑगस्टमध्येच उजनी धरण 100 टक्के कडे वाटचाल करत असल्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…