Categories: करमाळा

आमदार.संजयमामा शिंदे यांना सर्वसामान्यांचा वाढता पाठींबा मिळत असुन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संगठन बैठकांचे नियोजन करणार- ॲड. अजित विघ्ने


करमाळा  प्रतिनिधी- करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार. संजयमामा शिंदे यांच्या संयमी व विकासप्रिय नेतृत्वाला सर्वसामान्य मतदारांची पसंती मिळताना दिसत आहे. मामांनी आमची कामे एका फोनवर तात्काळ समक्ष मार्गी लावली आहेत तसेच आमच्यासारख्या सर्वसामान्यांना आमदार साहेब सहजासहजी भेटतात , प्रत्येकाला मान सन्मान देतात अशा प्रतिक्रीया जनता जनार्दनांच्या असुन, करमाळा तालुक्यातील गलिच्छ आणि गटातटाच्या राजकारणाला कंटाळलेली सर्वसामान्य जनता मामांच्या पाठीशी कायम ऊभी राहणार आहे. याबाबत आता चर्चा होत आहे. या पार्श्वभुमीवरच गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गावोगावी कार्यकर्ता संगठन बैठकांचे नियोजन चालु असुन..प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय बैठका होणार असुन या बैठाकांमधुन कार्यकर्त्यांशी वार्तालाप, युवक संघटन, विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. याबाबतची माहिती आमदार समर्थक ॲड.अजित विघ्ने यांनी दिली आहे. तसेच राजकीय विरोधक व खरी जातीवादी मंडळी आमदार संजयमामा शिंदे यांचेवर चुकीचे पद्धतीने जातिवादाचे गलिच्छ आरोप मिडियाचे माध्यमातुन करीत आहे. खरे तर त्यांनी विकासकामांवर बोलले पाहिजे. निवडणुका जवळ आल्या की टिका टिप्पणी होतातच परंतु कोणीही खालच्या पातळीवर जाऊन कोणावरही टिकाटिप्पणी करू नये..याला करमाळा तालुक्यातील जनता कधीच भिक घालणार नाही. आमदार मामासाहेब जातियवादी नसुन विकासप्रिय लोकहितवादी नेतृत्व आहे. आणि जातियवादी कोण आहेत ते जनतेला चांगल माहीत आहे असेही वक्तव्य ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

3 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

6 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

6 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

7 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

1 week ago